मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune: ग्रामपंचायत बोगस भरती प्रकरण भोवलं, 14 ग्रामसेवक, 2 कृषी विस्तार अधिकारी निलंबित

Pune: ग्रामपंचायत बोगस भरती प्रकरण भोवलं, 14 ग्रामसेवक, 2 कृषी विस्तार अधिकारी निलंबित

Pune gramsevak suspended : पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 20 ग्रापंचायतींमध्ये बोगस नोकर भरती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात 22 अधिकार्‍यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Pune gramsevak suspended : पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 20 ग्रापंचायतींमध्ये बोगस नोकर भरती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात 22 अधिकार्‍यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Pune gramsevak suspended : पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 20 ग्रापंचायतींमध्ये बोगस नोकर भरती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात 22 अधिकार्‍यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

पुणे, 20 डिसेंबर : पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) समाविष्ट झालेल्या 20 ग्रापंचायतींमध्ये बोगस नोकर भरती (Recruitment scam) झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात 22 अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यातील 16 जणांना निलंबित केले असून, संबंधित ग्रामपंचायतींतील 212 माजी ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. (14 Gram Sevak Suspended in Punr Grampanchayat recruitment scam)

काय आहे प्रकरण?

पुणे महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी 20 ग्रामपंचायतींमध्ये चुकीच्या पद्धतीने कर्मचारी नियुक्त केले आहेत, अशा तक्रारींची चौकशी करण्यासाठी तत्कालीन महिला व बालविकास अधिकारी दत्तात्रय मुंडे यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल मुख्यकार्यकारी अधिकारी यांना सादर केला आहे. ग्रामपंचायतींवर प्रशासक असताना अधिकार्‍यांनी नियम बाह्य नोकर भरती केल्याचा आरोप निश्‍चित करण्यात आला आहे. त्यानुसार 14 ग्रामसेवक आणि दोन कृषी विस्तार अधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे. या 20 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायती पुणे महापालिकेत जाण्यापूर्वी 658 जणांची भरती करण्यात आल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.

पुणे जिल्हा परिषदेतील पंचायत आणि सामान्य प्रशासन विभागांनी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यानुसार कर्मचार्‍याच्या यादीसह अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पुणे महानगरपालिकेसह ग्रामविकास आणि पंचायत राज विभागालाही सादर करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेने प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून, कायद्यानुसार विभागीय चौकशीची सुनावणी विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे, असे आयुष प्रसाद यांनी सांगितले आहे.

वाचा : पेपरफुटी प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक

चौकशी करू नये, यासाठी प्रचंड दबाव आणि वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. 60 हजार पेक्षा जास्त पानांच्या कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी चौकशी समितीने अहवाल सादर केला आहे. पिसोळी  शेवाळवाडी, म्हाळुंगे या ग्रामपंचायतींमध्ये नोकर भरतीमध्ये चुकीचे कामे झाली नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.

TET परीक्षा घोटाळा प्रकरणातील आरोपीच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध परीक्षांच्या पेपर फुटीची प्रकरणं समोर आली आहेत. आरोग्य भरतीनंतर, म्हाडा आणि आता टीईटी पेपरफुटी प्रकरणाने राज्यातील वातावरण तापून निघालं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे.

यानंतर आता पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. छापेमारीत आरोपी सुपे याच्या घरात पोलिसांना दोन कोटीहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळले आहेत. सुपे यांच्या घरी छापा टाकायच्या आधी पत्नी आणि मेहुण्याने ही रक्कम दुसऱ्या ठिकाणी लपवली होती.

First published:

Tags: Gram panchayat, Job, Pune