मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune Firing caught in CCTV: पिंपरी चिंचवडमध्ये तरुणावर गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद

Pune Firing caught in CCTV: पिंपरी चिंचवडमध्ये तरुणावर गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद

गोळीबाराच्या घटनेने पुन्हा हादरलं पुणे; भरदिवसा तरुणावर गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद

गोळीबाराच्या घटनेने पुन्हा हादरलं पुणे; भरदिवसा तरुणावर गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद

Pune Firing CCTV: पुण्यात एका तरुणावर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड, 18 डिसेंबर : पुण्यात घडलेली गोळीबाराची (Firing in Pune) घटना ताजी असतानाच आता पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणावर गोळीबार (firing on youth in Pimpri Chinchwad) झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरात असलेल्या कातेपूरम चौकात ही घटना घडली आहे. या गोळीबारात पीडित तरुणाचा मृत्यू झाला आहे. (Pimpri Chinchwad youth died in firing incident)

अज्ञाताकडून गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील कातेपूरम येथे सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. एका तरुणावर गोळीबार करुन आरोपीने पळ काढला आहे. या घटनेत पीडित तरुण जखमी झाला असता त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव योगेश जगताप असल्याची माहिती समोर आली आहे.

हल्ल्यामागचं कारण काय?

या हल्ल्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. मात्र, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केला असावा असा प्राथमिक अंदाजातून वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आपला तपास सुरू केला आहे.

वाचा : पुण्यात टोळक्याचा धुडगूस;CCTVत कैद झालेल्या गुंडांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही हल्ला आणि गोळीबाराची ही घटना घटनास्थळी असलेल्या एका सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. दरम्यान भरदिवसा झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

पुण्यात एका 'गोल्डनमॅन'ची 6 गोळ्या झाडून हत्या

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम व्यावसायिकावर भरदिवसा गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली होती. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी तब्बल 6 गोळ्या झाडल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर मनूर शेखअसं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. सोमवारी (6 डिसेंबर) दुपारी बाराच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर झाला आहे. प्रचंड वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर चंद्रभागा चौकात मारेकऱ्यांनी तब्बल 6 गोळ्या घालून त्यांचा खून केला. संबंधित हत्या आर्थिक कारणातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

वाचा : देवदर्शनाला गेलेल्या लगीन घरातून दागिने लंपास, पोलिसांनी काही तासांतच केले गजाआड

बंदुकीचा धाक दाखवून दरोडा

पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे दुकानावर दरोडा पडला आहे. चार दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी (7 डिसेंबर) रात्री साडेदहा वाजता घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आळेफाटा येथील बोरी बुद्रुक येथे अविनाश पटाडे यांचे साई इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश करुन त्यांना बंदुकीचा धाक दाखविला. बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी दुकानातील रोख रक्कम चोरून नेली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

First published:

Tags: Cctv footage, Crime, Pimpri chinchawad, Pune