मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune : पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा गोळीबार, 11वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या

Pune : पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा गोळीबार, 11वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या

पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा गोळीबार, 11वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या

पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा गोळीबार, 11वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या

Pimpri Chinchwad Pune Crime news: पिंपरी चिंचवडमध्ये एका 17 वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरतात एकच खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवड, 23 डिसेंबर : पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. महिन्याभरात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. आता पिंपरी चिंचवडमध्ये एका 17 वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (17 year old child shot dead in Pimpri Chinchwad)

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास नॅशनल हॅवी कंपनीसमोर 17 वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. मृतक मुलाचे नाव दशांत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक मुलगा हा बुधवारी सायंकाळच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. मात्र, बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही अखेर त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर या मुलाचा मृतदेह नॅशनल हॅवी कंपनीसमोर आढळून आला. त्याच्या डोक्याला गोळी लागल्याचंही दिसून आलं.

वाचा : मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

सांगवीत तरुणावर गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद

18 डिसेंबर रोजी सुद्धा एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणावर गोळीबार झाला होता. पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरात असलेल्या कातेपूरम चौकात ही घटना घडली होती. या गोळीबारात पीडित तरुणाचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमधील कातेपूरम येथे 18 डिसेंबर सकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. एका तरुणावर गोळीबार करुन आरोपीने पळ काढला. या घटनेत पीडित तरुण जखमी झाला असता त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव योगेश जगताप असल्याची माहिती समोर आली.

Pune robbery cctv : बंदुकीचा धाक दाखवून दरोडा, आळेफाटा येथील घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्यात एका 'गोल्डनमॅन'ची 6 गोळ्या झाडून हत्या

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम व्यावसायिकावर भरदिवसा गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली होती. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी तब्बल 6 गोळ्या झाडल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर मनूर शेख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. सोमवारी (6 डिसेंबर) दुपारी बाराच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर झाला आहे. प्रचंड वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर चंद्रभागा चौकात मारेकऱ्यांनी तब्बल 6 गोळ्या घालून त्यांचा खून केला. संबंधित हत्या आर्थिक कारणातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

First published:

Tags: Crime, Pimpri chinchawad, Pune