पुणे, 12 डिसेंबर: आज राज्यभरात म्हाडाचा (MHADA) पेपर होणार होता. मात्र पेपर फुटल्याचा संशय आल्यानंतर हा पेपर (Paper Was Canceled) रद्द करण्यात आला. या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोन एजंट बुलढाण्याचे (Buldhana) तर एक जण परीक्षा घेणारा संस्थेतील पुण्यातील (Pune) आरोपी असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान पुणे सायबर पोलिसांची कार्यवाही केली असून मोठे मासे गळाला लागले आहेत.
जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक प्रितीश देशमुख, एजंट संतोष हरकळ आणि एजंट अंकुश हरकळ अशी आरोपींची नावं आहेत. हे आरोपी म्हाडा परीक्षेचा पेपर फोडायच्या तयारीत होते. मात्र विश्रांतवाडीतून रात्री दहा वाजता त्यांना ताब्यात घेतलं.
हेही वाचा- आशिष शेलारांविरोधातल्या बॅनरबाजीवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
जी ए सॉफ्टवेअर कंपनीकडे परीक्षा आयोजनाचं कंत्राट होतं. तिघेही आरोपी रात्री पेपर फोडण्याच्या तयारीनं एकत्रित आले असताना पुणे सायबर पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडलं. पुणे सायबर पोलिसांच्या या कारवाईमुळे म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द करावी लागली.
असा झाला भांडाफोड
जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुख आणि दोन एजंट हे रात्री विश्रांतवाडी परिसरामध्ये पेपर देण्यासाठी आले होते. तेव्हाच पुणे सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि अटक केली. हा पेपर रात्रीतून रद्द करण्यात आला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पेपर मोठ्या रकमेला विकला जाणार होता. हा पेपर होण्याआधीच पोलिसांच्या जाळ्यात मुख्य सूत्रधार अडकला याच्यामागे कोण मोठे सूत्रधार आहेत. याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
हेही वाचा- HBD Yuvraj Singh: टीम इंडियाला केले 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन, कॅन्सरवर मात करणारा ऑल राऊंडर
हा पेपर कशा पद्धतीने फुटला जाणार होता कशा पद्धतीने पुणे पोलिसांनी अटक केली. यापूर्वीही पुणे पोलिसांनी आरोग्य भरतीतील अनेक मोठे अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्याचबरोबर लष्कर भरतीचाही पर्दाफाश पुणे पोलिसांनी केलाय . यामागे क्लास चालवणारे मोठ्या प्रमाणावर असतात असा संशय पुणे पोलिसांना होता आणि त्याच आधारे महाडा पेपरफुटीचे बिंग फुटले गेले .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jitendra awhad, Pune