मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुण्यात डिलिव्हरी बॉयचं अश्लील कृत्य; तरुणीला बघून उघडली पॅन्टची चैन, अन्...

पुण्यात डिलिव्हरी बॉयचं अश्लील कृत्य; तरुणीला बघून उघडली पॅन्टची चैन, अन्...

या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार (Kondhwa police station) दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार (Kondhwa police station) दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार (Kondhwa police station) दाखल करण्यात आली आहे.

पुणे, 06 डिसेंबर: पुण्यात (Pune) एक धक्कादायक प्रकार (shocking incident) घडला आहे. एका डिलिव्हरी बॉयनं (delivery boy) तरुणीला बघून अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार (Kondhwa police station) दाखल करण्यात आली आहे.

एका घरात डिलिव्हरी बॉय रात्री उशिरा डिलिव्हरी देण्यासाठी गेला होता. तेव्हा घरात एका तरुणीला बघून त्यानं आपल्या पॅन्टची चैन उघडली आणि लज्जास्पद कृत्य केलं.

उंड्रीतील 23 वर्षीय तरुणीनं या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डिलिव्हरी बॉय सतिश केंधले विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा डिलिव्हरी बॉय रोमान्ना फॅशन्स इंडिया कंपनीचा होता.

हेही वाचा- आधी जिलेटीनचा स्फोट, नंतर  चोरट्यांनी ATM मधून लंपास केली लाखोंची रक्कम

समोर आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीनं एक्से पॅरिस ब्रॅड व्हाया रोमान्ना फॅशन्स इंडिया या कंपनीची लॅपटॉप बॅग ऑर्डर केली होती. 1 डिसेंबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास या लॅपटॉप बॅगची डिलिव्हरी करण्यासाठी आरोपी संतोष केंधले घरी आला होता. त्यावेळी त्यानं आपल्या पॅन्टची चैन उघडून लज्जास्पद कृत्य केलं.

तक्रारदार तरुणीच्या आईनं घडलेला सर्व प्रकार समजल्यानंतर त्याला फोन करुन जाब विचारला असता, संतोष यानं मी कोणालाही घाबरत नाही, काय करायचे आहे ते करा, असं बोलून तक्रारदार तरुणीच्या आईला धमकी दिली.

हेही वाचा- Omicron संदर्भात राज्यात ठरणार नियमावली?, आदित्य ठाकरेंचं सूचक विधान

तरुणीनं यासंबंधी कंपनीकडेही तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दगडे याप्रकरणाचा तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune (City/Town/Village)