मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune Crime : खाऊसाठी बाहेर नेत जन्मदात्या बापानेच अवघ्या 7 वर्षीय मुलीला फेकले नदीत

Pune Crime : खाऊसाठी बाहेर नेत जन्मदात्या बापानेच अवघ्या 7 वर्षीय मुलीला फेकले नदीत

पुणे जिल्ह्यातील बजरंगवाडी परिसरात खळबळजनक घटना घडल्याने परिसर हादरून गेला आहे. अवघ्या सात वर्षे वयाच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार (दि. 27) घडला होता.(pune crime)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

पुणे, 29 सप्टेंबर : पुणे जिल्ह्यातील बजरंगवाडी परिसरात खळबळजनक घटना घडल्याने परिसर हादरून गेला आहे. अवघ्या सात वर्षे वयाच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार (दि. 27) घडला होता. दरम्यान याबाबत मुलीच्या शोधासाठी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलिसांनी अथक प्रयत्न केल्यानंतर आता या घटनेत वेगळेच सत्य सामोरे आले आहे. या मुलीचा बापानेच खून केल्याचे उघड झाले आहे. याबाबत पोलिसांनी खुलासा केला आहे. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.

अपेक्षा युवराज साळुंखे (वय 7, रा. बजरंगवाडी शिक्रापूर, ता. शिरूर) असे खून झालेल्या मुलीचे नाव असून, वडील युवराज साळुंखे (वय 30) याने अपेक्षा हिला वेळ नदीत पाण्यात फेकून ठार मारल्याची कबुली आरोपीने दिली आहे. अनेक सीसी टीव्ही फुटेज तपासल्यानंतर अपेक्षा ही आरोपी-वडिलांबरोबरच दिसून आली. अपेक्षा हिच्या चपलाही मिळण्याच्या काठावर मिळून आल्या आहेत.

हे ही वाचा : सिंधुताई सपकाळ अनाथालयाच्या नावाने घातला जातोय ऑनलाईन गंडा! काय आहे प्रकरण जाणून घ्या

परंतु, शिक्रापूर पोलिस वेळ नदीच्या पात्रात मृतदेहाचा शोध घेत असून, अद्यापी मृतदेह मिळून आलेला नाही. हा खून कुठल्या कारणासाठी केला, याबाबत अजून आरोपीने माहिती दिलेली नाही. मंगळवारी (दि. 27) सायंकाळच्या सुमारास अपेक्षा ही घरातून जवळच असलेल्या टपरीवर खाऊ आणण्यासाठी गेली होती, परंतु ती घरी परतली नाही.

यानंतर तिच्या आईने अपेक्षा हिचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याबाबतची तक्रार शिक्रापूर पोलीस स्थानकात दिली होती. सध्या लहान मुलांना पळून नेणारी टोळी कार्यरत असल्याची अफवा संपूर्ण राज्यात पसरल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हे ही वाचा : वसईतल्या स्फोटाने तिघांचा जीव घेतला, सात जणांची रुग्णालयात झुंज सुरु, नेमकं काय घडलं?

या पार्श्वभूमीवर या मुलीचे अपहरण झाल्याने परिसरामध्ये खळबळ पसरली होती. हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलीस निरीक्षक शेडगे यांनी आवाहन केले आहे, की सध्या लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी आली आहे, ही अफवा असून, या घटनेचा काहीही संबंध नाही व कुणीही अशा प्रकारच्या अफवा पसरवू नये.

First published:

Tags: Crime, Crime news, Pune, Pune (City/Town/Village), Pune crime, Pune crime news