मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune Crime : पुणे तिथे काय उणे, कुत्रं अंगावर गेल्याने पोरीने पोलीसांकडे थेट केली तक्रार

Pune Crime : पुणे तिथे काय उणे, कुत्रं अंगावर गेल्याने पोरीने पोलीसांकडे थेट केली तक्रार

दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या युवतीवर रॉट व्हीलर कुत्रा अंगावर धावल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या युवतीवर रॉट व्हीलर कुत्रा अंगावर धावल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या युवतीवर रॉट व्हीलर कुत्रा अंगावर धावल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

  पुणे, 07 ऑगस्ट : दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या युवतीवर रॉट व्हीलर कुत्रा अंगावर धावल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. (Pune Crime) पुण्यातील सेनापती बापट रोडवरील शिवाजी हौसिंग सोसायटीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीजीमध्ये राहणाऱ्या एका युवतीने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवती आपण अंडी खरेदी करण्यासाठी बाहेर आलो असता हा प्रकार घडला असल्याचं सागितले आहे.

  रॉटव्हीलर कुत्रा हा त्या मालकाने फिरवण्यासाठी आणला होता मात्र त्यांच्या गळ्यात पट्टा नसल्याने तो कुत्रा युवतीच्या अंगावर आला, यावेळी कुत्रा मालकाला या युवतीने विचारले तेव्हा मालकाने तिला शिव्या दिल्या. याप्रकरणी अज्ञात कुत्रा मालका विरोधात चतुरशुर्गी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता या प्रकरणी पोलीस या अज्ञात कुत्रा मालकाचा शोध घेत आहेत.

  हे ही वाचा : निलेश राणेंनी केसरकरांना दिली ड्रायव्हरच्या नोकरीची ऑफर, शिंदे गट-भाजपमध्ये वाद चिघळला

  कुत्रा पाळण्याचे नियम माहिती आहेत का तुम्हाला?

  एनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांनी पाळीव कुत्र्यासाठी काही नियम बनवले आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे, जर कोणी घरमालक कुत्रा पाळत असेल आणि महानगरपालिकेचे कोणत्याही नियमाचे उल्लंघन न करता, शेजारच्यांना त्रास न देता. कुत्रा घरात ठेवत असेल तर तो कुत्रा पाळू शक भारतीय संविधान आर्टिकल A(G) नुसार प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे की तो प्राण्यांबद्दल दया, प्रेम दाखवू शकतो. त्याचबरोबर अधिनियम 1960 11 (3) नुसार हाऊसिंग सोसायटीत पाळीव प्राण्यांना पाळण्याचा अधिकार आहे. याशिवाय भाडेकरूदेखील घरात कुत्रा पाळू शकतो.

  कुत्र्याचा भुकण्यांवरून आक्षेप घेतला जाऊ शकतो.

  कुत्र्याच्या भुंकण्यावरुन वाद होतात. पण कुत्रा भुंकतो म्हणून त्याला घरात ठेवण्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. परंतु कुत्रा खूपच भुंकत असेल तर त्याच्यावर उपचार करणे हे मालकाचे काम आहे.

  हे ही वाचा : ...अजूनही दरवाजे खुले, शिवसेनेच्या नेत्याचे मोठे विधान, शिंदे गटातले आमदार परतणार?

  शेजारीचे कसे करू शकता तक्रार ?

  खूप लोकांची समस्या असते की कुत्रा खूप जास्त भुंकत असेल ज्याने शेजारच्यांना त्रास होत असेल अशावेळी के करावे? यासाठी समोरच्या व्यक्तीला समज दिली जाते. जर तुम्हाला कोर्टात तक्रार करायची असेल तर ध्वनी प्रदूषण होत आहे म्हणून तक्रार करू शकतात. त्यात आवाज, घाणेरडा वास या तक्रारीचा समावेश असतो.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Dog, Pune, Pune (City/Town/Village), Pune crime

  पुढील बातम्या