मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चिंता वाढली : दक्षिण आफ्रिकेहून पुण्यात आलेल्यांपैकी एक जण Covid पॉझिटिव्ह, 4 जण क्वारंटाईन

चिंता वाढली : दक्षिण आफ्रिकेहून पुण्यात आलेल्यांपैकी एक जण Covid पॉझिटिव्ह, 4 जण क्वारंटाईन

Pune News: दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूने चिंता वाढवली आहे. त्यातच आता आफ्रिकेहून मुंबईत आलेल्या एका पुणेकराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

Pune News: दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूने चिंता वाढवली आहे. त्यातच आता आफ्रिकेहून मुंबईत आलेल्या एका पुणेकराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

Pune News: दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूने चिंता वाढवली आहे. त्यातच आता आफ्रिकेहून मुंबईत आलेल्या एका पुणेकराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

पुणे, 30 नोव्हेंबर : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट (Omicron variant of Coronavirus) आढळून आला आहे. हा व्हेरिएंट खूपच घातक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सर्वच देशांनी खबरदारीच्या उपाययोजना आणि त्यासंदर्भात आवश्यक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्र सरकारही अलर्ट झाले असून त्यांनीही योग्य ती पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्याच दरम्यान आता चिंता वाढवणारी बातमी पुण्यातून समोर आली आहे. आफ्रिकेहून आलेल्या एका पुणेकराचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. (Pune citizen tests positive for Covid19, who was return from South Africa)

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील चौघेजण हे परदेशात फिरायला गेले होते आणि त्यापैकी एका व्यक्तीचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकाचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याने इतर तिघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर पॉझिटिव्ह आलेल्या तरुणाला कोविड सेंटरमध्ये दाखल कऱण्यात आले आहे.

तसंच खबरदारी म्हणून तातडीने या प्रवाशाची ओमिक्रॉनची चाचणी (Omicron Variant) केली जाणार आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. या प्रवाशाला क्वारंटाइन करण्यात आले आहे.

वाचा : पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, पुणे मनपाचा मोठा निर्णय

दक्षिण आफ्रिकेतून किती प्रवासी मुंबईत आले?

डोंबिवलीतील (dombivali) एक तरुण दक्षिण आफ्रिकेवरून आला असून कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. पण, हा तरुण दक्षिण आफ्रिकेवरून आलेला एकमेव प्रवासी नसून 10 नोव्हेंबरपासून 1000 प्रवाशी मुंबईत आल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aditya thackery) यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे मुंबई महापालिकेत दाखल झाले. ओमायक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासोबत आढावा बैठक घेत आहे. याआधी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी शहरातील परिस्थितीबद्दल भाष्य केलं.

'राज्यात पर्यटनासाठी कोणी कुणाला अडवत नाही. पण काळजी घेणं गरजेचं आहे. गेल्या 10 नोव्हेंबरपासून दक्षिण अफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी आले आहे. या सर्व प्रवाशांना ट्रेस केले जात आहे. ते मुंबईत आहेत त्यांची माहिती घेतली जात आहे', अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या Corona रुग्णाच्या कुटुंबियांची चाचणी

दक्षिण आफ्रिकेवरून काही प्रवासी मुंबईत दाखल झालेत. या प्रवाशांची तपासणी केली असता एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या प्रवाशी डोंबिवलीमध्ये राहणारा आहे. दरम्यान आता त्याच्या कुटुंबियांचीही कोरोना टेस्ट घेण्यात आली. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांची झाली कोरोना चाचणी करण्यात आली. कुटुंबातील सात जणांची कोरोना चाचणी केली. कुटूंबातील सर्व सात सदस्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसंच रुग्ण राहत असलेल्या महापालिकेनं इमारतीमधील रहिवाशांचे कोरोना टेस्ट घेण्यास सुरुवात केली आहे. केडीएमसी च्या आरोग्य अधिकारी डॉ प्रतिभा पानपाटील यांनी ही माहिती दिली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Pune