मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune: बैलजोडीने उडी घेत वाचवले घाटात पडलेल्या मालकाचे प्राण, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

Pune: बैलजोडीने उडी घेत वाचवले घाटात पडलेल्या मालकाचे प्राण, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

बैलजोडीने उडी घेत घाटात पडलेल्या मालकाचे वाचवले प्राण, बैलगाडा शर्यतीतील VIDEO VIRAL

बैलजोडीने उडी घेत घाटात पडलेल्या मालकाचे वाचवले प्राण, बैलगाडा शर्यतीतील VIDEO VIRAL

जोरदार वेगाने आलेल्या बैलजोडीने उडी घेत आपल्या मालकाचे प्राण वाचवले आहेत. बैलगाडी शर्यतीतील या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

जुन्नर, 31 मे : बैलगाडा शर्यतींचा (Bullock cart race) घाटातला एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. घाटात घोडीवरून पडलेल्या आपल्या मालकाला बैलांनी समयसूचकता दाखवत आकाशात उंच झेप घेऊन वाचवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ जुन्नर येथील असल्याचं बोललं जात आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, मालक हा जमिनीवर कोसळतो आणि त्यानंतर मागून वेगाने आलेल्या बैलजोडीने मालकाला पाहून आकाशात उंच झेप घेतली. धुरेकरी बैलांनी थेट हवेत सूर मारला आणि जीव मुठीत घेतलेल्या मालकाला साधं खरंचटल सुद्धा नाही. मुक्या बैलांच्या या समजदारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) सुद्धा होत आहे. मुक्या प्राण्यांचे मालकावर किती प्रेम आहे याचा प्रत्यय या व्हिडिओमधून येतोय. यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बैलगाडा घाटात शर्यत सुरु असताना मालक समोरुन धावत असलेल्या घोडीवरुन खाली पडला, मात्र मुक्या प्राण्यांनीच मालकाचे प्राण वाचवल्याचं पाहायला मिळालं. रायगडमध्ये मालकाने बैलगाडा शर्यत जिंकली पण मृत्यूने मात्र हरवलं सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. त्यानंतर राज्यभरात बैलगाडा शर्यतींचे आयोजन सुरू झाले आहे. मात्र, याच बैलगाडा शर्यतीत अनेकदा अपघात झाल्याच्या घटना समोर येत आहेत. काही महिन्यांपूर्वी रायगड जिल्ह्यातही बैलगाडा शर्यती दरम्यान झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव उमेश वर्तक असून ते अलिबाग पंचायत समिती सदस्य होते. बैलगाडी स्पर्धेत आपली गाडी पहिल्या नंबरवर असल्याचा आनंद अनुभवत असताना मागून आलेल्या दुसऱ्या बैलगाडीने धडक दिल्याने उमेश वर्तक हे गंभीर जखमी झाले होते. उमेश वर्तक याची महिनाभर चाललेली मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. उमेश वर्तक (53 वर्षे) यांची प्राणज्योत मालवली. वाचा : रायगडमध्ये बैलगाडा शर्यतीत मोठी दुर्घटना; बैलजोडी थेट प्रेक्षकांच्या अंगावर फेब्रुवारी महिन्यातही अपघात रायगडमध्ये सुद्धा बुधवारी (2 फेब्रुवारी 2022) एका बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या बैलगाडा शर्यतीत मोठी दुर्घटना घडली होती. बैलजोडी थेट प्रेक्षकांवर आल्याने तिघेजण जखमी झाले आहेत. या घटनेचा अंगावर काटा आणणारा लाईव्ह व्हिडीओ सुद्धा समोर आला होता. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त सदर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडी शर्यत सुरू होताच अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांच्या अंगावर आली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली होती.
First published:

Tags: Pune, Shocking viral video

पुढील बातम्या