मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

PFI बंदीनंतर भाजप पुन्हा आक्रमक, पुण्यात एमआयटीमधला पाकिस्तानचा झेंडा जाळला

PFI बंदीनंतर भाजप पुन्हा आक्रमक, पुण्यात एमआयटीमधला पाकिस्तानचा झेंडा जाळला

देशभरामध्ये PFI संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. पुण्याच्या एमआयटीमध्ये भाजपने पाकिस्तानचा ध्वज जाळला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 29 सप्टेंबर : देशभरामध्ये PFI संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. अशातच पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये ज्या 48 देशांचे ध्वज लावण्यात आले आहेत, त्यामध्ये पाकिस्तानचा सुद्धा ध्वज होता. पाकिस्तानचा हा ध्वज एमआयटी कॉलेजमध्ये जाऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाळला आहे.

पुण्यामध्ये पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता, त्या आंदोलनामध्ये असा एक व्हिडिओ प्रसारित झाला ज्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप होत आहे. हे लोक जर अशा घोषणा देत असतील, तर आपल्याला आपल्या देशातील शिक्षण संस्थेमध्ये पाकिस्तानचे झेंडे कशाला हवेत? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. कोथरूडमधल्या एमआयटी शिक्षण संस्थेमध्ये जाऊन भाजपने पाकिस्तानचा ध्वज जाळला आहे.

पुण्यातील नामवंत एमआयटी कॉलेज हे विश्वविद्यालय म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जगभरातील 48 देशांचे ध्वज लावण्यात आलेले आहेत.

एनआयएन, ईडी आणि पोलिसांच्या मदतीने देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पीएफआय या संघटनेवर मागच्या आठवड्यात धाडी टाकण्यात आल्या. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पीएफआय या संघटनेवर 5 वर्षांची बंदी घातली आहे. देशविघातक कृत्यांना प्रोत्साहन देणे, दहशतवादाला खतपाणी घालणे आणि यासाठी परदेशातून निधी गोळा करणे, यासारखे वेगवेगळे आरोप पीएफआय या संघटनेवर लावण्यात आले आहेत.

First published: