मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune : उधारीवर दारू न दिल्याने सटकली; विक्रेत्यावर दगडाने केला हल्ला, घटनेचा CCTV आला समोर

Pune : उधारीवर दारू न दिल्याने सटकली; विक्रेत्यावर दगडाने केला हल्ला, घटनेचा CCTV आला समोर

Pune liquor shop seller beaten, incident caught in cctv: पुण्यात दारू विक्रेत्याला एका टोळक्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. उधारीवर दारू न दिल्याने टोळक्याने ही मारहाण केली आहे. ही घटना सीससीटीव्हीत कैद झाली आहे.

पुणे, 29 डिसेंबर : उधारीवर दारू मागितल्याने विक्रेत्याने देण्यास नकार दिला. यानंतर संतापलेल्या टोळक्याने विक्रेत्याला जबर मारहाण (liquor seller beaten) केली आहे. पुण्यातील मांजरी येथे ही घटना घडली आहे. दारू विक्रेत्याला टोळक्याने चक्क दगडाने मारहाण केली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद (Caught in CCTV) झाला आहे. या प्रकरणी पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Liquor seller beaten by mob in Pune, incident caught in CCTV)

काय आहे प्रकरण?

25 डिसेंबरला रात्री साडेदहा ते 11 वाजण्याच्या सुमारास मांजरी येथे दरडे मार्गावरील शिवाज्ञा बिअर शॉपीमध्ये ही घटना घडली आहे. आरोपीने उधारीवर दारूची मागणी केली होती. दारू उधार मागितली असता दुकानदाराने उधार देण्यास नकार दिला त्यामुळे टोळीने शिवीगाळ करून विक्रेत्याच्या डोक्यात आणि पाठीवर दगडाने मारले. या मारहाणीत दारू विक्रेता गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी दुकानदार साईराज सुधीर हिंगणे यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी आरोपी संतोष घुले आणि ओमकार घाडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

वाचा : पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

पिंपरीत Wine Shop चालक आणि ग्राहकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

वाईन शॉपमध्ये आलेल्या ग्राहकांमध्ये आणि वाईन शॉप चालकात झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. पिंपरीतील रिगल वाईन्स शॉपमध्ये झालेली फ्री स्टाईल हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. ग्राहकांनी वाईन शॉपमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करत दुकानाचीही तोडफोड केली. वाईन शॉप मालकाला दारुडे मारहाण करत असल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. तर दारुडे दुकानाबाहेर तोडफोड करत असतानाची दृश्य रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली होती.

उधार न दिल्याने पिंपरीतील बेकरीत तोडफोड

उधार न दिल्याच्या रागातून एका ग्राहकाने बेकरीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या महिन्यात घडली होती. पिंपरी - चिंचवड येथील काळेवाडी परिसरात असलेल्या न्यू रॉयल बेकरी नावाच्या दुकानात ही तोडफोडीची घटना घडली होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. ग्राहकांनी बेकरी मालकाकडे खाण्या-पिण्याचे पदार्थ उधार देण्याचा तगादा लावला. बेकरी मालकाने ते सामान उधार देणार नाही असे ठाम पणे सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरून दुकानात ग्राहक म्हणून दाखल झालेल्यांनी बेकरीत तोडफोड केली.

First published:

Tags: Cctv footage, Crime, Pune