मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदे गट म्हणतोय, मॉलमध्ये वाइन विक्री एकदम ओके, फडणवीस देणार का होकार?

शिंदे गट म्हणतोय, मॉलमध्ये वाइन विक्री एकदम ओके, फडणवीस देणार का होकार?

'मी या खात्याचा राज्यमंत्री होतो. मात्र वाइन विक्रीच्या या निर्णयाच्या ड्राफ्टबाबत भारतीय जनता पक्षाला योग्य ती माहिती मिळाली नाही'

पुणे, 22 सप्टेंबर : महाविकास आघाडी सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला होता. पण, आता शिंदे सरकार वाईन विक्रीच्या निर्णयावर ठाम आहे. 'मॉलमध्ये वाइन विक्रीचे धोरण हे राज्याच्या हिताचे आहे,शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे' असं म्हणत उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांनी निर्णय घेणारच असा पवित्रा घेतला आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना शंभुराजे देसाई यांनी सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीच्या निर्णयाबद्दल मोठं विधान केलं. मॉलमध्ये वाईन विक्री करावी की नको यासाठी मागील सरकारने लोकांकडून मते मागवली होती. ही मते प्राप्त झाली असून त्याचा अभ्यास सुरू आहे. लोकांच्या या मतांची शहरी भागातील लोकांची मते आणि ग्रामीण भागातील लोकांची मते अशी विभागणी करण्यात येत आहे. येत्या आठ दिवसांत या मतांचा आम्ही अभ्यास करणार आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणार, अशी माहिती शंभुराजे यांनी दिली. ('हिंमत होती तर त्यावेळी...' फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल) महाविकास आघाडी सरकारमधेही मी या खात्याचा राज्यमंत्री होतो. मात्र वाइन विक्रीच्या या निर्णयाच्या ड्राफ्टबाबत भारतीय जनता पक्षाला योग्य ती माहिती मिळाली नाही, असा खुलासाच देसाई यांनी केला. ('...तेव्हा वडिलांना मातोश्रीत ठेवून फाईव्ह स्टारमध्ये कोण होतं?', भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार) 'मॉलमध्ये वाईन विक्रीचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. कारण शेतकऱ्यांना त्यांची द्राक्षं थेट वाईन कंपन्याना विकता येणार आहेत. वाईन विक्रीच्या हा ड्राफ्ट घेऊन मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. मला खात्री आहे ते शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतील, असा विश्वासही देसाईंनी केला.
First published:

पुढील बातम्या