पुणे, 06 डिसेंबर: पुण्यातील पीएमपी बस चालकाने (PMP bus driver) भरधाव वेगाने बस चालवल्याने (Drive bus over speed) एका पुणेकराच्या मणक्यात गॅप निर्माण (get gap in spine) झाल्याची घटना समोर आली आहे. बस चालकाने गतिरोधकावरून वेगात बस चालवल्यामुळे बस जोरात आदळली. त्यामुळे संबंधित प्रवाशाच्या मणक्यात गॅप निर्माण झाला आहे. या घटनेनंतर संबंधित प्रवाशानं थेट पोलीस ठाण्यात धाव घेत, चालकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. प्रवाशाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
अस्लम कादर शेख असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी बस चालकाचं नाव आहे. तर राजू मोतीराम चिंचवडकर असं 62 वर्षीय फिर्यादीचं नाव आहे. याप्रकरणी चिंचवडकर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चिंचवडकर हे 27 नोव्हेंबर रोजी लोहगाव ते कात्रज या बसमधून प्रवास करत होते.
हेही वाचा-27 वर्षीय मॉडेलवर सामूहिक बलात्कार; 2 दिवस हॉटेलमध्ये सुरू होता भयावह प्रकार
बस कात्रज येथील सर्प उद्यानासमोर आली असता, चालकाने वाहतुकीच्या नियमांकडं दुर्लक्ष करत भरधाव वेगात बस चालवली. रस्त्यावर गतिरोधक असताना देखील चालकाने ब्रेक लावला नाही. चालकाने भरधाव वेगाने बस गतिरोधकावरून पुढे नेली. त्यामुळे पीएमपी बस जोरात आदळली. यावेळी बसमधून प्रवास करणाऱ्या फिर्यादीच्या मणक्यात गॅप निर्माण झाला आहे.
हेही वाचा-BREAKING: दिवसाढवळ्या 6 गोळ्या घालून तरुणाची हत्या; पुण्यातील थरारक घटना
या घटनेला बस चालकच जबाबदार असल्याची तक्रार फिर्यादींनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune