मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Pimpri: आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचं गूढ उकललं, हल्ल्यामागचं नेमकं कारण आलं समोर

Pimpri: आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचं गूढ उकललं, हल्ल्यामागचं नेमकं कारण आलं समोर

Pune Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर झालेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्यामागचं कारण आता मसोर आलं आहे.

Pune Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर झालेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्यामागचं कारण आता मसोर आलं आहे.

Pune Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर झालेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्यामागचं कारण आता मसोर आलं आहे.

पिंपरी चिंचवड, 27 नोव्हेंबर : भाजप आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांचे भाऊ शंकर जगताप (Shankar Jagtap) यांच्या कार्यालयावर तीन दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. दुचाकीवरुन आलेल्या तरुणांनी शंकर जगताप यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब (petrol bomb) टाकून पळ काढलेला होता. या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला आणि आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींनी हल्ल्यामागचं सांगितलेलं कारण ऐकून सर्वच हैराण झाले.

हल्ल्यामागचं कारण काय?

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले की, या हल्ल्याप्रकरणी 23 वर्षीय प्रद्युम्न भोसले याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या प्रद्युम्न याने सांगितले की, अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केलं. झालं असं की, प्रद्युम्न याचा काही दिवंपूर्वी वाढदिवस झाला. वाढिदवसाच्या दिवशी तो केक कापण्यासाठी आपल्या मित्रांसोबत शंकर जगताप यांच्या कार्यालयात गेला होता. शंकर जगताप यांनी केक कापावा अशी त्याची इच्छा होती. मात्र, ते केक न कापताच निघून गेल्याने प्रद्युम्न संतापला.

वाचा : लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळला जोडप्याचा मृतदेह, दिघी परिसरातील घटनेने खळबळ

बदला घेण्याचा निर्णय

केक न कापल्याने प्रद्युम्न हा शंकर जगताप यांच्यावर संतापला आणि त्याने आपल्या अपमानाचा बदला घेण्याचं ठरवलं. यानंतर त्याने रागाच्या भरात शंकर जगताप यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकून पळ काढला. प्रद्युम्न भोसले याच्यासोबत या कृत्यात सहभागी असलेल्या त्याच्या इतर मित्रांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

वाचा : औरंगाबादमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी, परिसरात भीतीचे अन् तणावाचे वातावरण, VIDEO Viral

नेमकं काय घडलं होतं?

23 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर जगताप यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना घडली होती. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. 23 नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास ही घटना घडली. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयाच्या दिशेने अज्ञात दुचाकीस्वाराने पेट्रोल बॉम्ब फेकून पळ काढला.

शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या चंद्ररंग कार्यलयाच्या दिशेने हे पेट्रोल बॉम्ब फेकल्या गेले. एका मोपेडवर आलेल्या तीन तरुणांनी कार्यालयाच्या दिशेनं पेट्रोल बॉम्ब फेकले. एकूण दोन बॉम्ब फेकण्यात आले होते. पेट्रोल बॉम्ब कार्यलयाच्या बाजूला असलेल्या रोहित्रावर आदळले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

First published:

Tags: Crime, Pimpri chinchawad