मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात मृतांचे अवशेष खातात डुक्कर; प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह 

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात मृतांचे अवशेष खातात डुक्कर; प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह 

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या शवविच्छेदन गृहाशेजारी शवविच्छेदन करण्यात आलेल्या मृत व्यक्तीचे अवशेष उघड्यावर टाकण्यात आले असून ते अवशेष डुक्करे (pig), कुत्रे (dogs) आदी प्राणी खात असल्याचे समोर आले आहे.

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या शवविच्छेदन गृहाशेजारी शवविच्छेदन करण्यात आलेल्या मृत व्यक्तीचे अवशेष उघड्यावर टाकण्यात आले असून ते अवशेष डुक्करे (pig), कुत्रे (dogs) आदी प्राणी खात असल्याचे समोर आले आहे.

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या शवविच्छेदन गृहाशेजारी शवविच्छेदन करण्यात आलेल्या मृत व्यक्तीचे अवशेष उघड्यावर टाकण्यात आले असून ते अवशेष डुक्करे (pig), कुत्रे (dogs) आदी प्राणी खात असल्याचे समोर आले आहे.

पुणे, 27 डिसेंबर :  इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात (Indapur Sub-District Hospital) माणुसकीला लाजवेल असा प्रकार समोर आलाय. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या शवविच्छेदन गृहाशेजारी शवविच्छेदन करण्यात आलेल्या मृत व्यक्तीचे अवशेष उघड्यावर टाकण्यात आले असून ते अवशेष डुक्करे (pig), कुत्रे (dogs) आदी प्राणी खात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचा बेफिकीरपणा यातून स्पष्ट होतोय. या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरुन या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोशींवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होतोय.

इंदापूर तालुक्यात अपघाताच्या घटना घडत असतात. तालुक्यात सध्या इंदापूर उपजिल्हा रुग्णालय या एकाच ठिकाणी शवविच्छेदन प्रक्रिया पार पाडली जाते. मयत व्यक्तीचे शरीराचे अवशेष काढून (विशिष्ट केमिकल) एन्झायमच्या मदतीने ते अवशेष प्लास्टिक भरणीत साठवणूक करून प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात. तर त्याचा एक नमुना हा याच ठिकाणी साठवण्यात येतो. मात्र काही कालावधीनंतर सदरचे अवशेष हे एका विशिष्ट पद्धतीने ते नष्ट करावयाचे असतात. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाने असे न करता सदरचे अवशेष प्लास्टिक भरणीसह शवविच्छेदन गृहाशेजारीच उघड्यावर जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नात मांसाचे सर्व तुकडे जाळले गेलेले नाहीत. त्यामुळे उघड्यावर पडलेल्या या अवशेषांना सध्या डुक्करे, भटकी कुत्री खात आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार यातून दिसून येत आहे.

हेही वाचा : 5G ची प्रतीक्षा संपली! कधी आणि कोणत्या शहरांमध्ये सर्वात आधी होणार लॉन्चिंग

दरम्यान, सोमवारी (27 डिसेंबर) जनार्धन सिताराम गोळे (वय 65) यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृत शरीर इंदापूर उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी शवविच्छेदनासाठी आणले असता त्यांचे नातलग गणेश पवार हे त्या ठिकाणी उपस्थित होते. गणेश पवार यांच्यासमोरच शवविच्छेदन गृहाच्या शेजारी पडलेले हे अवशेष भटके कुत्रे आणि डुक्करे खात होती. हे वास्तव पाहून एक नागरिक म्हणून या सर्व प्रकरणावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

काढलेल्या अवशेषांची जर अशी विटंबना होत असेल तर हा प्रकार अतिशय निंदनीय आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे. याबाबत इंदापूर उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुहास शेळके यांना विचारणा केली असता सदरील प्रकार चुकीचा घडला असल्याचे त्यांनी मान्य केलं. तसेच सदर अवशेषांची अशाप्रकारे विल्हेवाट लावा, असे मी कोणतेही आदेश दिलेले नाहीत, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले.

First published:
top videos