Home /News /maharashtra /

पुणे हादरलं! वहिनीवर ससून रुग्णालयात उपचार, घरी काकाने पुतण्या-पुतणीची केली भयंकर अवस्था

पुणे हादरलं! वहिनीवर ससून रुग्णालयात उपचार, घरी काकाने पुतण्या-पुतणीची केली भयंकर अवस्था

वडकी येथे राहणाऱ्या या महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगा (वय ८) व मुलगी (वय ४) आहे. आता ती मागील 5 महिन्यांपासून दुसऱ्या पतीबरोबर राहते.

    पुणे, 3 जुलै : पुण्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. (Physical Abused in Pune) घर सोडून गेलेल्या महिलेच्या दीराने तिच्या मुलांसोबतच दुष्कृत्य केल्याची घटना घडली. (Physcial Abused by uncle in pune) याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni kalbhor police) 30 वर्षांच्या आरोपी काकाला अटक केली आहे. या घटनेने पुणे हादरलं आहे. काय आहे नेमकं प्रकरण -  पुण्यातील एका 30 वर्षीय महिलेचा पती घर सोडून निघून गेला आहे. ती वडकी परिसरात राहते. ती मुलाच्या प्रसूतीसाठी ससून रुग्णालयात दाखल झाली होती. तर घरी तिचा ८ वर्षांचा मुलगा आणि ४ वर्षांची मुलगी एकटेच होते. मात्र, यावेळी अत्यंत संतापजनक घटना घडली. दीर त्यांना घेऊन स्वत:च्या घरी गेला होता. तर दुसरीकडे या महिेलेला मुलगा झाला. घरी आल्यावर तिने मुलीची व मुलाची अवस्था पाहिल्यावर चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. भंगार गोळा करण्याचे काम करते महिला -  वडकी येथे राहणाऱ्या या महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगा (वय ८) व मुलगी (वय ४) आहे. आता ती मागील 5 महिन्यांपासून दुसऱ्या पतीबरोबर राहते. मात्र, आता गेल्या 4 महिन्यांपासून तिचा दुसरा पती घर सोडून निघून गेला आहे. आपली उपजीविका भागवण्यासाठी ती भंगार गोळा करते. ती गर्भवती असल्याने आता तिचे दिवस भरत आले. यामुळे ती तिच्या मुलांना शेजाऱ्यांकडे सोपवून ससून रुग्णालयात 20 मे रोजी दाखल झाली. यानंतर तिला मुलगा झाला. रुग्णालयातून तिला 23 मे रोजी सोडण्यात येणार असल्यामुळे तिने मोठ्या दिराला फोन करून बोलावले. यानंतर त्यांनी तिला वडकी येथील घरी सोडले. यावेळी शेजारी चौकशी केल्यावर तिचा धाकटा दीर मुलांना घेऊन त्याच्या घरी गेल्याचे तिला समजले. दुसऱ्या दिवशी या महिलेने तीन पिंपळमळा येथून आपल्या मुलांना घरी आणले. मात्र, मुलांच्या अंगावर वळ दिसल्याने तिने विचारल दिराला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर दुसऱ्या दिवशी मुलांना आंघोळ घालताना मुलीबाबत काहीतरी वाईट घडल्याचे तिच्या लक्षात आले. तिने चौकशी केल्यावर छोट्या काकाने अत्याचार केल्याचे चार वर्षांच्या मुलीने सांगितले. तसेच त्याचा खूप त्रास होत असल्याचेही तिने सांगितले. तर सोबतच मुलाबाबतही हाच प्रकार घडला होता. त्याच्यावर काकाने अनैसर्गिक अत्याचार केला होता. हेही वाचा - धक्कादायक! पुण्यातील नामांकित भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, 8 तरुणींना काढलं बाहेर या दोघांनी सांगितलेल्या हकीकतीने तिच्यावर जणू आभाळच कोसळले. तिने लोणी काळभोर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या 30 वर्षांच्या आरोपी काकाला अटक केली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune crime news, Sexual assault

    पुढील बातम्या