मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: PFI च्या आंदोलनात गोंधळ, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा; काहींना अटक

VIDEO: PFI च्या आंदोलनात गोंधळ, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा; काहींना अटक

पुण्यामध्ये या आंदोलनादरम्यान पाकिस्तान जिंदाबाद आणि नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Kiran Pharate

पुणे 24 सप्टेंबर : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (PFI) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) देशभरातील अनेक राज्यांमध्ये कारवाई केली आहे. याविरोधात अनेक ठिकाणी PFIकडून आंदोलन करण्यात आलं आहे. पुण्यामध्ये या आंदोलनादरम्यान पाकिस्तान जिंदाबाद आणि नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील काही PFI कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत ही घोषणाबाजी केली. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, ज्यांना आज सकाळी अटक करण्यात आली असल्याचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

Kerala Hartal: बंद बेकायदेशीर, हिंसाचार सहन करू शकत नाही, केरळ हायकोर्टाचं PFI विरोधात कठोर पाऊल

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याच्या प्रयत्नादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईमध्ये ही घोषणाबाजी केली. ईडी, सीबीआय आणि पोलिसांच्या छाप्याविरोधात पीएफआयचे कार्यकर्ते पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमले होते, यावेळी हा प्रकार घडला.

पीएफआयविरोधातील कारवाईचा निषेध करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचं नियोजन या आंदोलकांनी केलं होतं. मात्र हे आंदोलन सुरु होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आलं. यानंतर आजसकाळी यातील काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

गाड्यांची तोडफोड, भाजप कार्यालयावर हल्ले; NIA च्या छापेमारीविरोधात PFI चं हिंसक आंदोलन

ANI या वृत्तसंस्थेनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यामध्ये हे आंदोलक पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देताना दिसत आहेत.

यावेळेस आंदोलकांनी ‘आरएसएस मुर्दाबाद’ अशीही घोषणाबाजी केली असल्याचं समजत आहे. हे वृत्त ANI च्या हवाल्याने देण्यात आलं आहे.

First published:

Tags: Nia