मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प; गाड्यांच्या लांबच लांब रांगा

पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प; गाड्यांच्या लांबच लांब रांगा

 जुना पुणे-मुंबई महामार्ग हा संपूर्णतः ठप्प झाल्याचे सध्या पहायला मिळत आहे.

जुना पुणे-मुंबई महामार्ग हा संपूर्णतः ठप्प झाल्याचे सध्या पहायला मिळत आहे.

जुना पुणे-मुंबई महामार्ग हा संपूर्णतः ठप्प झाल्याचे सध्या पहायला मिळत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

 लोणावळा, 2 ऑक्टोबर : ठाकरे, आगरी, कोळी सीकेपी बांधवांचे कुलदैवत असलेल्या लोणावळ्यातील कार्ला एकविरा गडावर भाविकांनी आज गर्दीचा उचांक गाठला आहे. एकविरा देवीच्या भक्तांनी गडावर तुफान गर्दी केली आहे. त्यामुळे जुना पुणे-मुंबई महामार्ग हा संपूर्णतः ठप्प झाल्याचे सध्या पहायला मिळत आहे.

कार्ला एकविरा गड हा भाविकांनी फुल्ल झाला असल्यामुळे जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील वाहने ही पुढे सरकत नसल्याने या महामार्गावरील वाहतूक ही ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कित्येक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर कार्ला गडदेखील भाविकांच्या तुफान गर्दीने फुल झाला आहे. त्यामुळे आता पोलिसांना या भाविकांना रोखण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

बातमी अपडेट होत आहे.

First published:

Tags: Mumbai, Mumbai pune expressway, Pune