मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यातून महिलांच्या बेपत्ता होण्याच्या वृत्ताने पोलिसात खळबळ; 7 महिन्यात 870 गायब, काय आहे कारण?

पुण्यातून महिलांच्या बेपत्ता होण्याच्या वृत्ताने पोलिसात खळबळ; 7 महिन्यात 870 गायब, काय आहे कारण?

पुण्यातून महिला बेपत्ता होण्यामागील धक्कादायक कारणं समोर आली आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde
पुणे, 28 जुलै : राज्यातील (Maharashtra) पुणे (Pune) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महिला गायब होत असल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. गेल्या 7 महिन्यात जिल्ह्यात 840 महिला गायब झाल्या आहेत. जिल्हा पोलिसानी 2022 मध्ये दिलेल्या आकड्यांनुसार, वर्षाच्या सुरुवातीला 7 महिन्यात 840 महिला बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 396 महिलांची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. सर्वाधिक जून महिन्यात 186 महिला बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मे महिन्यात 135 महिला बेपत्ता झाल्या. पिंपरी-चिंचवड पोलीस कमिश्नरेटच्या हद्दीत 885 महिला बेपत्ता झाल्या आहेत. तर पुणे ग्रामीण पोलिसांनी यादरम्यान 743 महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बेपत्ता होण्यामागील काय आहे कारण? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला घरातून अचानक गायब होण्याच्या घटनांमुळे जिल्ह्यात चिंता वाढली आहे. या बेपत्ता प्रकरणांमध्ये अधिकतर महिला कुटुंबातील कलह, नोकरीचा शोध आदी कारणांसाठी घर सोडलं आहे. मात्र काही वेळानंतर त्यांना आपली चूक लक्षात आली आणि परत घरी परतल्या. अधिकतर महिला 16 ते 25 वर्षांच्या आहेत. यांनी घरगुती वाद किंवा कुटुंबातील सातत्याने होणाऱ्या वादामुळे घर सोडलं आहे. मानवी तस्करीचाही संशय.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मानवी तस्करी असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. मानवी तस्करीच्या जाळ्यात ओढलेल्या महिला या कुटुंबातील वाद, प्रेमात फसवणूक, अवैध संबंधामुळे हे पाऊल उचलतात. पोलिसांनी पुढे असंही सांगितलं की, अनेक महिला या परतल्याही आहेत. अनेक महिला या स्वतंत्र जगू इच्छितात. घरातील परंपरावादी विचार त्यांना मान्य नव्हती. त्यामुळे ते घर सोडत आहेत. अनेक महिलांचं अपहरणही केलं जात आहे.
First published:

Tags: Crime news, Pune, Women

पुढील बातम्या