Home /News /maharashtra /

सुप्रिया सुळेंनी नितीन गडकरींसमोर मांडली पुणेकरांची समस्या, पत्राद्वारे केली 'ही' मागणी

सुप्रिया सुळेंनी नितीन गडकरींसमोर मांडली पुणेकरांची समस्या, पत्राद्वारे केली 'ही' मागणी

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून त्यामुळे ध्वनिप्रदूषण होते.

    पुणे, 17 जून : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांना एक पत्र लिहिले आहे. पत्राद्वारे सुप्रिया सुळे यांनी मंत्री नितीन गडकरींकडे वाहतूक समस्यांबाबत एक मागणी केली आहे. (MP Supriya Sule letter to Minister Nitin Gadkari) सुप्रिया सुळेंनी लिहिलेल्या पत्रात काय पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषणही होते. हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर वाढती वाहनांची गर्दी आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण याचा त्रास पुण्यातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्येची खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी लिहिले आहे की, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून त्यामुळे ध्वनिप्रदूषण होते. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी पुण्यातील महामार्गावर वाकड ते नर्हे या मार्गावर साऊंडप्रुफ वॉल/बॅरियर उभारावेत, अशी विनंती गृहनिर्माण संस्था आणि विविध संस्था करत आहेत. त्यामुळे याठिकाणी वाढलेली वाहतूक आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदुषणाच्या समस्येबाबत लक्ष घालावे, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. हेही वाचा - विधानपरिषद निवडणूक : मलिक- देशमुखांचा मतदानाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला यासोबतच पुणे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकात होणारी वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच मंत्री नितीन गडकरी आणि NHAI प्राधिकरण याबाबत चौकशी करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Nitin gadkari, Pune, Supriya sule, Traffic

    पुढील बातम्या