मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोना, पती सदानंद सुळेही कोविड पॉझिटिव्ह

Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोना, पती सदानंद सुळेही कोविड पॉझिटिव्ह

Supriya Sule tests covid positive: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Supriya Sule tests covid positive: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Supriya Sule tests covid positive: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 29 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) आणि त्यांचे पती सदानंद सुळे (Sadanand Sule) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत: ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे. (NCP MP Supriya Sule and her husband Sadanand Sule tests positive for covid 19)

आपल्या ट्विटमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं, "मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या."

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना

गेल्या काही दिवसांपासून राज्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने होत असल्याचं पहायला मिळत आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती काल (28 डिसेंबर) समोर आली आहे. मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वत: ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली होती.

वाचा : विधानसभा अध्यक्षपद निवडणूक: राष्ट्रवादीचा 'पॉवर' प्ले अन् काँग्रेसचा गेम?

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लावण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, काल महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना बाधितांची एकूण संख्या 11492 इतकी होती आणि आज ही संख्या 29 हजारावर जाण्याची शक्यता आहे. मुंबईत 1300 सक्रिय रुग्ण आहेत आज संध्याकाळी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. रुग्ण दुप्पटीचं प्रमाण वाढत आहे. सक्रिय रुक्णांची संक्या दररोज ही 400 ते 500 होती पण आता ही संख्या 2000 च्या पुढे आज असण्याची शक्यता आहे.

आपल्या येथे जर निर्बंधांचे पालन केले नाही आणि सहजासहजी सर्व गोष्टी घेतल्या तर त्याची किंमत आपल्याला मोजावी लागेल. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आपल्याया करावेच लागेल. निर्बंध लावण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री, टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग एकत्रितपणे घेईल. आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल आणि कदाचित थोड्या प्रमाणात निर्बंध लावण्यावर निर्णय होऊ शकेल असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

पोलिसांना सांगून बंधने

आरोग्यमंत्री म्हणाले, लग्न समारंभ असतील किंवा इतर मोठे कार्यक्रम सुद्धा कुठलेही नियमांचे पालन न करता होत आहेत त्यामुळे अशा ठिकाणी पोलिसांना आणि प्रशासनाला सांगून बंधने आणावी लागतील.

First published:

Tags: Supriya sule