पुणे, 10 जुलै : आज देवशयनी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022) आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी आज पुण्यात प्रति पंढरपूर असलेल्या मंदिराला भेट देत विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी साधलेल्या संवादात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पुढील 25 वर्षासाठी शुभेच्छा, असा टोला त्यांनी लगावला. (Supriya Sule Criticized CM Eknath Shinde)
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे -
विठ्ठलाचे आशीर्वाद आणि आभार मानण्यासाठी मी आले आहे. सरकार अस्थिर आहे, दादा म्हणतोय ते खरं आहे. लोक सुरत, गुवाहाटी, गोवा फिरून आले. भारतदर्शन करून आले. बाहेरील राज्यातील पोलीस आपल्या आमदारांना हाताळत होते हे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शिवसेनेला मित्रपक्ष म्हणून साथ दिली आणि देत राहणार आहोत. बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवला होता त्याला दुखावणे म्हणजे बाळासाहेबांना दुखावल्या सारखे आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या २५ वर्षासाठी शुभेच्छा, असा टोमणाही लगावला.
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढील 25 वर्षांसाठी शुभेच्छा', अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. #supriyasule #Eknath_Shinde #marathinews pic.twitter.com/3HkttaBq9X
— News18Lokmat (@News18lokmat) July 10, 2022
हेही वाचा - jayant patil vs eknath shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा जयंत पाटलांना दणका, 3 हजार कोटींच्या कामांना स्थगिती
शिंदे सरकार हे असंवेदनशील सरकार -
सरकार एका विमानातून उतरून दुसऱ्या विमानात बसते आहे. फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजाराची दाढी करते आहे, कटिंग करते आहे. त्यामुळे यात सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी मात्र भरडला जात आहे. त्यामुळे यांना सर्वसामान्यांचे काही घेणं देणं नाही. शिंदे सरकार हे असंवेदनशील सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.