मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अमोल कोल्हे अमित शाहंच्या भेटीला, आढळराव टेन्शनमध्ये? पाहा काय म्हणाले

अमोल कोल्हे अमित शाहंच्या भेटीला, आढळराव टेन्शनमध्ये? पाहा काय म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. अमोल कोल्हेंच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीवर शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Shreyas

नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. अमोल कोल्हेंच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, तसंच वेगवेगळे तर्कवितर्कही बांधले जाऊ लागले. कोल्हे यांनी शिवप्रताप गरुडझेप या त्यांच्या चित्रपटाच्या निमित्ताने शाह यांची भेट घेतल्याचं अधिकृत कारण समोर आलं आहे. पण शाह-कोल्हे यांच्या भेटीमागे काहीतरी वेगळं राजकीय कारण तर नाही ना? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

अमोल कोल्हे-अमित शाह यांच्या या भेटीवर शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'ते भाजपमध्ये जाणार का नाही? हा विषय अमोल कोल्हे आणि भाजप पक्षश्रेष्ठी यांच्यातला आहे. या कारणासाठी ते तिकडे गेले असावेत, असं मला वाटत नाही, त्यांचा एकच हेतू होता. गरुडझेप चित्रपटाच्या स्क्रीनिंगचं निमंत्रण देण्यासाठी ते त्याठिकाणी गेले होते. मलाही त्यांनी निमंत्रण पाठवलं आहे, फोनही केला. खरी परिस्थिती काही वेगळी असेल तर सांगता येत नाही', असं वक्तव्य शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं आहे.

2019 लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. यानंतर राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायची भूमिका घेतली तरी आढळराव पाटील राष्ट्रवादी आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका करतच होते. शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

अमित शाह हे केंद्रात सत्तेत असलेल्या प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत. सीबीएसईच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सविस्तर स्वरुपात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर अजूनही महाराजांच्या स्वराज्याचा भगवा ध्वज नाही. या मागण्या पूर्ण करायला प्रभावशाली नेत्यांचं पाठबळ मिळालं, तर या मागण्या पूर्ण होण्यासाठी मदत होईल, असं अमोल कोल्हे म्हणाले.

First published:

Tags: Amit Shah