मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज? अजित पवारांचं नाव घेत जयंत पाटलांनी सोडलं मौन

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज? अजित पवारांचं नाव घेत जयंत पाटलांनी सोडलं मौन

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अजित पवारांना (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते पद दिलं गेल्यामुळे जयंत पाटील (Jayant Patil) नाराज झाल्याची वृत्त प्रसिद्ध झाली होती, यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  Shreyas
पुणे, 7 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अजित पवारांना (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते पद दिलं गेल्यामुळे जयंत पाटील नाराज झाल्याची वृत्त प्रसिद्ध झाली होती, पण या सगळ्या बातम्या जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्या आहेत. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मीच कसा अजित पवारांच्या नियुक्तीवर नाराज होऊ? असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला आहे. प्रफुल्ल पटेलांचा जयंत पाटलांना फोन? जयंत पाटील हे राष्ट्रवादीमधल्या अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. सत्तेत असताना जयंत पाटील यांनी गृह, वित्त, ग्रामीण विकास यासह अनेक महत्त्वाची मंत्रिपदं सांभाळली. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळाचे गटनेतेही आहेत. जयंत पाटील यांनी अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त केल्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं नाही. यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांना दोनदा फोन करून 53 पैकी 36 आमदारांनी स्वाक्षरी करून अजित पवारांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे, अशी आठवण करून दिली, असं वृत्त हिंदुस्तान टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलं होतं. अजित पवार यांना विरोधीपक्ष नेतेपदासाठी पाठिंबा देणारे पत्र मागण्यासाठी धनंजय मुंडे जयंत पाटील यांच्याकडे गेले होते. तेव्हा आपण थोड्याच वेळात पत्र देऊ असे पाटील म्हणाले परंतु त्यांनी पत्र दिले नाही. अखेर प्रफुल पटेल यांना जयंत पाटलांना दोन वेळा फोन करावा लागला, असा दावा या वृत्तात करण्यात आला होता.
First published:

पुढील बातम्या