मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुंबई पुणे एक्सप्रेस-वे वर 6 गाड्यांचा विचित्र अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू; Terrible Accident Video

मुंबई पुणे एक्सप्रेस-वे वर 6 गाड्यांचा विचित्र अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू; Terrible Accident Video

यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेवर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.

यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेवर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.

यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेवर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.

पुणे, 18 ऑक्टोबर: मुंबई पुणे एक्सप्रेस (Mumbai-Pune Expressway) वेवर भीषण अपघात (Terrible Accident) झाला आहे. यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेवर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली. खंडाळा (Khandala Ghat) घाटातील किमी 39 येथे सहा वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाला. यात तीन जणांचा जागीच मृत्यू (Three people died) झाला.

यंत्रणांनी अथक प्रयत्न करुन सदरच्या वाहनांमध्ये अडकलेले मृतदेह आणि जखमी लोकांना बाहेर काढलं आहे.तसंच अपघातग्रस्त वाहने बाजूला करत विस्कळीत झालेली वाहतूक सातच्या सुमारास पूर्ववत सुरु केली.

मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणार्‍या एका टेम्पो चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि टेम्पो समोरील भाजीच्या टेम्पोवर जाऊन आदळला. तसंच टेम्पो समोरील कारवर आदळला आणि कोंबडी वाहक टेम्पोनं एका प्रवासी बसला धडक दिली तर एक कार टेम्पो आणि ट्रेलरच्या मध्ये चिरडली गेली. अशा प्रकारे हा विचित्र अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

यामध्ये एका हुंदयाई कारमधील चालक आणि अन्य एक जण असे दोन तर कोंबडी वाहक टेम्पोचा चालक असे एकूण 3 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर 6 जणांना वाचवण्यात यश आले आहे. अनेक कोंबड्या ही या अपघातात दगावल्यात.

हेही वाचा- भरधाव स्पोर्ट्स बाईकच्या अपघाताचा Live Video, तरुण-तरुणी जागीच ठार

बोरघाट पोलीस, खोपोली वाहतूक पोलीस, आयआरबी, डेल्टा, मृत्युंजय देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला घटनास्थळी धाव घेत मृत आणि जखमी यांना बाहेर काढले.

First published:
top videos

    Tags: Accident, Mumbai pune expressway