मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अजून एक स्वप्नील! पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांची आत्महत्या; नैराश्यातून उचललं धक्कादायक पाऊल

अजून एक स्वप्नील! पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांची आत्महत्या; नैराश्यातून उचललं धक्कादायक पाऊल

अमर मोहिते हा मूळचा सांगली जिल्ह्याचा रहिवासी होता

अमर मोहिते हा मूळचा सांगली जिल्ह्याचा रहिवासी होता

MPSC च्या विद्यार्थ्यांनी अचानक आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पुणे, 15 जानेवारी: काही महिन्यांपूर्वी पुण्यातील स्वप्नील लोणकर या MPSC च्या उमेदवाराने आत्महत्या (MPSC student ended Life) केली होती. याला काही उलटत नाही तोच आता पुण्यात अजून एक धकाकदायक घटना घडली आहे. पुण्यात राहून PSI चा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत त्यानं आत्महत्या केली आहे. अमर मोहिते (Amar Mohite Suicide in Pune) असं या विद्यार्थ्यांच नाव आहे. MPSC च्या विद्यार्थ्यांनी (MPSC student problems) अचानक आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अमर मोहिते हा मूळचा सांगली जिल्ह्याचा रहिवासी होता. तो पुण्यात अभ्यास कारण्यासाठी आला होता. राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ची तो तयारी करत होता. मागील दोन वर्षांपासून तो PSI ची तयारी कारत होता. दुर्दैवं म्हणजे मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द झाल्यामुळे तो पीएसआयच्या फिजिकलमधून (Physical Exam of PSI) बाहेर पडला होता, तेव्हापासूनच अमर नैराश्यात होता अशी माहिती समोर आली आहे.  काल मित्रांना भेटला त्यावेळी तो निराश वाटला. त्यातूनच आज त्याने रूमवर आत्महत्या केली अशी माहिती समोर येतेय.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे MPSC  (MPSC Exams 2022) च्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यात परीक्षा रद्द होणे, पुढे ढकलणे आणि नियुक्ती न मिळेल यावरून अनेक विद्यार्थी नैराश्यात आहेत. यातच मागील वर्षी स्वप्नील लोणकर या MPSC च्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनं करण्यात आली होती. MPSC च्या विद्यार्थ्यांचा मुद्दा चांगलाच तापला होता.

10वी उत्तीर्णांनो, देशसेवा करण्याची मोठी संधी! BSF मध्ये 2788 जागांसाठी भरती

यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं अनेक होतकरू विद्यार्थ्यांना धक्का बसला होता. मराठाआरक्षण अचानक रद्द झालं आणि अनेक विद्यार्थ्यांना भरतीला मुकावं लागलं होतं. अमर मोहिते या विद्यार्थ्यांचंही सिलेक्शन झालं होतं. मात्र मराठी आरक्षण रद्द झालं आणि अमरला फीझीकलमधून बाहेर पडावं लागलं होतं. त्यामुळे त्यानं हे पाऊल उचललं अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

विद्यार्थ्यांनो आत्महत्या हा पर्याय नाही

जीवनात असे अनेक वाईट चांगले प्रसंग येत असतात. कधी आपल्या चुकीमुळे तर कधी परिस्थितीमुळे आपण यशस्वी होऊ शकत नाही. मात्र या सर्व प्रसंगांचा सामना करणं आपल्या हातात आहे आणि आपण तेच करत राहणं अपेक्षित आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करताना नैराश्य आलं किंवा अपयश आलं तर आत्महत्या हा पर्याय नाही. मार्ग बदलणं हा पर्याय महत्त्वाचा आहे. त्यामुळे असं मोठं पाउल उचलणं उचित असणार नाही.

First published:
top videos

    Tags: Mpsc examination, महाराष्ट्र