मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अखेर 'ती' वेळ आली! 'या' तारखेपासून मान्सूनच्या परतीला होणार सुरुवात, शेवटच्या दिवशी..

अखेर 'ती' वेळ आली! 'या' तारखेपासून मान्सूनच्या परतीला होणार सुरुवात, शेवटच्या दिवशी..

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

वायव्य भारतातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक हवामान होत असून, उद्यापर्यंत (ता. 21) राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि कच्छच्या काही भागातून मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे.

  • Published by:  Rahul Punde
चंद्रकांत फुंदे, पुणे प्रतिनिधी पुणे, 20 सप्टेंबर : राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. जुलै महिन्यात सुरू झालेल्या पावसाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात थैमान घातले. यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मात्र पावसाने राज्यातील विविध भागात जोरदार हजेरी लावली. यानंतर नद्या, नाले ओसांडून वाहत आहेत. पर्यटकही या पावसाचा आनंद घेत आहेत. यातच आता हवामान खात्याने पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मान्सून परतीच्या प्रवासाला अखेर सुरूवात झाली आहे. जवळपास महिन्याभरापासून राज्यात कोसळणाऱ्या मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अखेर सुरुवात झाली आहे. गुजरातच्या कच्छ भागातून पाऊस माघारी फिरला आहे. पण, राज्यात अजूनही मान्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे. देशातून साधारण 15 ऑक्टोबर अखेर मान्सून एक्झिट घेणार असल्याची माहिती पुणे वेधशाळा प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. मान्सून उशिराने परतणार असल्याचा अंदाज होता. पण, ताज्या हवामान अंदाजानुसार मान्सून वेळेतच परतीच्या प्रवासाला लागल्याचे दिसत आहे. सर्वसाधारणपणे 17 ते 20 सप्टेंबर दरम्यान राजस्थानातून मान्सून परतीचा प्रवास सुरू होतो. दरम्यान, वायव्य भारतातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक हवामान होत असून, उद्यापर्यंत (ता. 21) राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि कच्छच्या काही भागातून मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे. यातच पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याला लागून समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. वाचा - Maharashtra Rain : राज्यातील या भागात पुढचे 3-4 दिवस मुसळधार पाऊस, हवामान खात्याने काय म्हटलं? 3-4 दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पाहता, पुढील 3-4 दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे ट्विट करत हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली. खान्देशात मुसळधार दरम्यान, जळगाव जिल्ह्यात झालेल्या सर्वत्र मुसळधार पावसामुळे नद्या, नाले वाहू लागले आहेत. काल जिल्ह्यातल्या 7 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. या पावसानं कापूस, मका ही पिकं धोक्यात आली आहेत, तर सर्वसामान्य जनजीवनही विस्कळीत झालं आहे.
First published:

Tags: Monsoon, Rain fall

पुढील बातम्या