Home /News /maharashtra /

'इतकंच लक्षात ठेव, त्याचा बाप वसंत मोरे आहे...'!; मुलाला मिळालेल्या धमकीच्या पत्रानंतर मनसे नेता आक्रमक

'इतकंच लक्षात ठेव, त्याचा बाप वसंत मोरे आहे...'!; मुलाला मिळालेल्या धमकीच्या पत्रानंतर मनसे नेता आक्रमक

वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचं पत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकीच्या पत्रामध्ये सावध राहा रुपेश असा मजकूर लिहिण्यात आला आहे. ही चिठ्ठी रुपेश मोरे यांच्या कारवर ठेवण्यात आली होती.

    पुणे 17 जून : मागील काही दिवसांपासून मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे (Vasant More) काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत आहेत. विविध उपक्रम आणि आंदोलनांमुळे वसंत मोरे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र, आता ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचं पत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकीच्या पत्रामध्ये सावध राहा रुपेश असा मजकूर लिहिण्यात आला आहे. ही चिठ्ठी रुपेश मोरे यांच्या कारवर ठेवण्यात आली होती. या प्रकरणी वसंत मोरे यांचे सुपूत्र रूपेश मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. स्वःतः वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित याबाबतची माहिती दिली. 'नाना पटोलेंचं मानसिक संतुलन बिघडतंय, काँग्रेस नेतृत्वास विनंती, रुग्णालयात घेऊन जा', आशिष शेलारांची खोचक टीका पोस्टमध्ये काय लिहिलंय? "मुलगा म्हटलं की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हटलं की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो...आमचंही अगदी तसंच आहे, पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही... राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही...गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हतं, पण आज ठरवलं तुमच्या सोबत बोललच पाहिजे... साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली, त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायफरमध्ये "सावध रहा रुपेश" अशी चिठ्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली... तसा तो कोणाच्या आध्यात मध्यात नसतो तरीही असं का ? हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय... आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबाबाबतीत असा विचार करायचा ? हे का तेच कळत नाही...भारती विद्यापीठ पोलीस बाकी तपास करत आहेत...तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमेऱ्यात दिसतोय... बाबा फक्त इतकंच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत ( तात्या ) मोरे आहे...!" गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचा विचार बदलला, वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधाच्या भूमिकेवर वसंत मोरे यांनी फारकत घेतली होती. यानंतर वसंत मोरे बरेच चर्चेत आले. पक्ष नाराजीचाही त्यांना मोठा फटका बसला. यानंतर पुणे शहराध्यक्ष पद वसंत मोरे यांना गमवावं लागलं. शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी झाल्यानंतरही राज ठाकरे यांनी स्वत: समजू काढल्याने वसंत मोरे अजूनही मनसेचे कार्यकर्ते आणि नगरसेवक म्हणून काम करत आहेत. मात्र पुणे मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं चित्र वारंवार दिसून आलं आहे. पुणे मनसेच्या नेत्यांकडून डावललं जात असल्याचा आरोप वसंत मोरे करत आले आहेत. अशात आता त्यांच्या मुलाला धमकीचं पत्र मिळाल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: MNS, Pune news

    पुढील बातम्या