मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुण्यात पोहोचण्याआधीच राज ठाकरेंना मोठा धक्का, रुपाली पाटील ठोंबरेंचा मनसेला 'जय महाराष्ट्र'

पुण्यात पोहोचण्याआधीच राज ठाकरेंना मोठा धक्का, रुपाली पाटील ठोंबरेंचा मनसेला 'जय महाराष्ट्र'

'मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे'

'मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे'

'मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे'

पुणे, 14 डिसेंबर : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thcakery) तीन दिवसांच्या दौऱ्यावर उद्या पुण्यात येत आहे. पण, त्याआधीच मनसेच्या धडाकेबाज महिला नेत्या रुपाली पाटील  ठोंबरे (Rupali Thombre Patil)  यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. रुपाली ठोंबरे यांनी राजीनामा दिल्यामुळे मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. ( MNS leader Rupali Thombre Patil resigned)

मनसेच्या डॅशिंग नेत्या म्हणून नावलौकिक असलेल्या रुपाली ठोंबरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे.

'मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे पत्रात लिहिलं आहे.

दिल्लीत संजय राऊतांविरोधातला FIR रद्द होणार, शिवसेनेच्या खासदारांचा दावा

तसंच, 'आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद आणि "श्री.राज ठाकरे" हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल' अशी भावना व्यक्त करत ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे.

रुपाली पाटील यांची पुण्यात मनसेच्या आक्रमक नेत्या  आणि डॅशिंग नेत्या म्हणून ओळख होती. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष कामं केली. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यामध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे.

याआधी त्यांनी पुणे महापालिकेत त्या माजी नगरसेविका होत्या. मनसेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्षा आणि पुणे मनसेच्या महिला शहराध्यक्षापदही भुषावले होते. तसंच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुद्धा रुपाली पाटील यांनी लढवली होती. पण, यात त्यांचा पराभव झाला.

राज ठाकरे तीन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) औरंगाबादच्या दौऱ्यानंतर  तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर (pune) येणार आहे. हा दौरा 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान होणार आहे.या दौऱ्यात राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांबरोबर वैयक्तिक पातळीवर संवाद साधून त्यांचे मत जाणून घेणार आहे.त्याच बरोबर येणाऱ्या निवडणुकीची रणनीती या दौऱ्यात ठरवण्यात येणार आहे.

विराटच्या सांगण्यावरूनच या खेळाडूचं टीम इंडियात कमबॅक, गांगुलीचा मोठा खुलासा

राज ठाकरे हे उद्या बुधवारी पुण्यात येणार आहे.आणि सकाळी 9 ते 11 शिवाजी नगर मतदार संघ आणि त्यानंतर 12 ते 2 कोथरूड मतदार संघ 4:30 ते 5:50 वाजता खडकवासला मतदार संघ आणि संध्याकाळी 6 ते 7:30 वाजता हडपसर मतदार संघ अशी बैठक होणार आहे. तर 16 डिसेंबरला सकाळी 9 ते 11 वाजता कसबा मतदारसंघ 12 ते 2 पर्वती मतदारसंघ दुपारी 4 ते 5:30 वाजता कॅन्टोन्मेंट मतदार संघ आणि संध्याकाळी 6 ते 7:30 वाजता वडगावशेरी मतदार संघाची बैठक घेणार आहे.शुक्रवारी 17 डिसेंबर ला आजी माजी नगरसेवक यांची बैठक होणार आहे, अशी माहिती यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.

First published: