'आज मतदान आहे, सर्वपक्षांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली आहे. भारतीय जनता पार्टी मागे कशी राहिली. पक्षाने आदेश दिले असून पहिल्यापासून पक्षाचा आदेश पाळणे हे आमच्या रक्तात भिणलेलं आहे. त्यामुळे पक्षासाठी मतदान करण्यासाठी निघाले आहे, असं टिळक यांनी ठामपणे सांगितलं. 'देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यांनी माझे आभार मानले आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी फोन करून विचारपूस केली होती. पक्षातील सर्व लोक काळजी घेत आहे, त्यामुळे विशेष ममत्व आहे' असंही टिळक म्हणाल्या. विशेष म्हणजे, मुक्ता टिळक यांनी राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही प्रकृती अत्यंत नाजूक असतानाही मुंबईत येऊन मतदान केलं होतं. त्यानंतर विजयी उमेदवारांनी मुक्ता टिळक यांच्या घरी जाऊन आभार मानले होते. दरम्यान, 4 उमेदवार सहज निवडून येतील एवढं संख्याबळ भाजपकडे आहे. मात्र पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला मोठं राजकीय कसब वापरावं लागणार आहे. त्यातही भाजपकडे लहान पक्ष आणि अपक्षांची अशी 8 अतिरिक्त मतं आहेत. त्यातच राज्यसभा निवडणुकीत भाजपने 9 आमदारांची मतं फोडण्यात यश मिळवलं होतं. भाजपला ही मतं विधान परिषदेतही मिळाली तर त्यांच्याकडे एकूण 123 मतं होत आहेत. त्यामुळे भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी 7 मतं कमी पडत आहेत. त्यासाठी भाजपला महाविकास आघाडीची आणखी 7 मतं फोडावी लागणार आहेत. तरंच भाजपच्या पाचही उमेदवारांना निवडून आणन्यासाठी 130 मतांचा जादुई आकडा गाठता येणार आहे. विधान परीषद निवडणुकीचे उमेदवार भाजप १. प्रविण दरेकर २. श्रीकांत भारतीय ३. राम शिंदे ४. उमा खापरे ५. प्रसाद लाड भाजपचे आमदार 106 + लहान पक्ष आणि अपक्ष आमदार 8 + राज्यसभा निवडणुकीत फोडलेले आमदार 9 = 123 (पाचवा उमेदवार जिंकण्यासाठी आणखी 7 मतांची गरज आहे.)भाजपच्या कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक या विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानासाठी पुण्याहून रवाना pic.twitter.com/zRtKV27SdC
— News18Lokmat (@News18lokmat) June 20, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.