Home /News /maharashtra /

Pune : 3 शाखांचा अभ्यास तोही एकाच कोर्समध्ये, मग तर जाॅबच्या संधीच संधी! 'हा' आहे MIT चा नवा कोर्स

Pune : 3 शाखांचा अभ्यास तोही एकाच कोर्समध्ये, मग तर जाॅबच्या संधीच संधी! 'हा' आहे MIT चा नवा कोर्स

एकाच शाखेतील शिक्षण घेतलं की, त्याच शाखेत आपल्याला करिअर करावं लागतं. पण, तिन्ही शाखांचा अभ्यास एकाच कोर्समध्ये करता आला, तर जाॅबच्या संधीच संधी निर्माण होतात. पुण्यातील MIT ने Liberal Arts चा कोर्स सुरू केला आहे.

    पुणे, 20 जून :  दहावी-बारावीच्या निकालांनंतर आर्टस्, कॉमर्स, सायन्सनंतर आता मेडिकलला जायचं की इंजिनीअरिंगला, फायनान्समध्ये करिअर करायचं की, ऑफबीट कोर्स निवडायचा, अशा अनेक प्रश्नांनी आतापर्यंत तुम्हाला भंडावून सोडलं असेल. पण, या सर्व पर्यायांना दूर ठेवून आपल्या आवडीच्या विषयात करिअर करायची इच्छा असेल तर त्यासाठी वेगळा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. आणि तो पर्याय म्हणजे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधील लिबरल आर्ट (liberal arts). चला तर जाणून घेऊया नव्या कोर्सविषयी. (MIT World Peace University start liberal arts course) लिबरल आर्ट्स या विषयात तुम्हाला आवडीच्या विषयात शिक्षण घेणे शक्य होत असून पारंपरिक शिक्षणापेक्षा हा वेगळा अनुभव ठरणार आहे. लिबरल आर्ट्सचे शिक्षण घेणे म्हणजे अनेक गोष्टी एकत्र शिकणे असा त्याचा अर्थ नसून पुस्तकांव्यतिरिक्त आजूबाजूच्या अनेक बाबींचे शिक्षण घेण्यासाठी मनाला प्रशिक्षित करणे, असे उद्गार नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनी काढले होते. हाच अनुभव ही पदवी घेताना तुम्हाला येईल. तिन्ही शाखांचं शिक्षण मिळणार एकाच अभ्यासक्रमात गेल्या काही वर्षांमध्ये लिबरल आर्ट्स या शाखेने शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळे व उल्लेखनीय स्थान निर्माण केले आहे. सोशल सायन्सेस (सामाजिक शास्त्रे), आर्ट्स (कला) आणि ह्युमॅनिटीज (मानवी समाज व सांस्कृतिक पैलूंचा अभ्यास करणारे शास्त्र) यांचा लिबरल आर्ट्सच्या या शाखेत समावेश होतो. यामधील तुम्हाला आवड असलेल्या निवडक विषयांचा समावेश तुम्ही तुमच्या लिबरल आर्ट्सच्या अभ्यासक्रमामध्ये करू शकता. वाचा : मुलांनो, करिअर इथंही चांगलंय! मुंबई विद्यापीठाकडून ‘पाली’चे 7 कोर्सेस सुरू; कसा कराल अर्ज? VIDEO जर तुम्हाला राज्यशास्त्र या विषयात रूची असेल तर राज्यशास्त्राबरोबरच संगणक आणि स्टॅटिक्स या विषयांची निवड करीत तुम्ही निवडणूक व मतमोजणी विश्लेषक अर्थात Psephologist म्हणून अधिक प्रभावीपणे काम करू शकता. जर तुम्हाला साहित्य या विषयात रस असेल तर साहित्य या विषयाबरोबर तुम्ही त्याला मॅनेजरिअल स्टडीची जोड देऊन पब्लिशिंग (प्रकाशन) व्यवसायात स्वत:चा वेगळा ठसा उमटवू शकता. वाचा : MH BOARD SSC RESULT: निकाल तर लागला! पण आता पुढे काय? ‘हे’ आहेत 10वी नंतरचे बेस्ट करिअर ऑप्शन्स याशिवाय लिबरल आर्ट्स या पदवीमध्ये पारंपरिक विषयांबरोबरच समकालीन विषयांच्या जोडीने तुम्ही अधिकाधिक नव्या गोष्टी शिकू शकता. या विषयामध्ये मानसशास्त्र, माध्यमे, मास मीडिया, पत्रकारिता, फाईन आर्ट्स, वैदिक विज्ञान, परफॉर्मिंग आर्ट्स या विषयांचा समावेश होतो. एकूणच काय तर... लिबरल आर्ट्सच्या माध्यमातून कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शास्त्रांच्या मर्यादेमधून बाहेर पडत तुम्ही प्रभावी व मुक्तपणे तुम्हाला आवडणाऱ्या विषयांचे शिक्षण घेऊ शकता. हा कोर्स का महत्वाचा आहे? याबरोबरच लिबरल आर्ट्स खेरीज बी. ए. ऑनर्स या पर्यायाचादेखील तुम्ही विचार करू शकता. यामध्ये तुम्हाला राज्यशास्त्र, मानसशास्त्र आणि इंग्रजी अशा ठराविक विषयांमध्येच आवड आहे आणि करिअर करायचे आहे तर सुरुवातीपासून तुम्हाला त्याच विषयाचा अभ्यास करण्याची संधी बी. ए. ऑनर्स या पदवीमध्ये मिळू शकते. या उलट ज्यांना एकापेक्षा जास्त विषयांमध्ये रस आहे आणि या सर्व विषयांचे एकत्रित ज्ञान घेऊन करिअर करण्याची इच्छा जे बाळगून असतील अशांसाठी लिबरल आर्ट्स हा महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त पर्याय आहे. या कोर्सची फी किती आहे? एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीस्कूल ऑफ लिबरल आर्ट्सच्या प्रमुख प्रा. प्रीती जोशी यांनी सांगितले की, "मागील काही वर्षात पारंपरिक शिक्षणाची वाट सोडून ऑफबीट किंवा नवीन विषयात अभ्यास करण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. नवनवीन पर्यायांचा शोध घेतला जातो आहे. यातलाच एक उत्तम पर्याय 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. याची फी 60,000 ते 3,50,000  प्रति वर्ष आहे. तसेच या कालावधीत इंटर्नशिप हा 6-30 क्रेडिट्सचा अनिवार्य घटक आहे." जाॅबच्या संधीच संधी मिळणार लिबरल आर्ट्सचा विचार केला तर सुदैवाने पुणे शहरात अनेक ठिकाणी या अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाते. उच्च शिक्षणाच्या जगात नावाजलेल्या अनेक संस्थांमध्ये या विषयाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्यामुळे या संधीचा नक्की फायदा घ्या. पब्लिकेशन हाऊसेस, क्रिएटिव्ह रायटिंग, ब्रँडिंग कम्युनिकेशन, मीडिया हाऊसेस, राजकीय विश्लेषक, सेफोलॉजिस्ट, कॉन्सेलर्स, शैक्षणिक, संशोधन इ. अशा विविध क्षेत्रात करिअरची विस्तृत व्याप्ती आहे. कोर्सची माहिती कशी घ्याल? कोर्सबद्दल विस्तृत माहिती आणि अर्ज करण्यासाठी https://liberal-arts.mitwpu.edu.in या वेबसाईटला भेट द्या. तसेच 020 7117 7104 क्रमांकावरही तुम्ही संपर्क साधू शकता. सर्वेक्षण क्रमांक, 124, पौड रोड, कोथरूड, पुणे, महाराष्ट्र 411038 या पत्त्यावर जाऊन कोर्सविषयी माहिती घेऊ शकता.
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job alert, Maharashtra News, Pune, जॉब

    पुढील बातम्या