मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्रात टीईटी परीक्षा घोटाळा? MHADA पेपरफुटीचा सूत्रधार प्रितीश देशमुखच्या घरी झाडाझडती, धक्कादायक माहिती आली समोर

महाराष्ट्रात टीईटी परीक्षा घोटाळा? MHADA पेपरफुटीचा सूत्रधार प्रितीश देशमुखच्या घरी झाडाझडती, धक्कादायक माहिती आली समोर

 
म्हाडा सरळसेवा भरती 2021परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

म्हाडा सरळसेवा भरती 2021परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

MHADA recruitment paper leak case: म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून आता आणखी एक नवी माहिती समोर आली आहे.

पुणे, 16 डिसेंबर : आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपरफुटल्याचं प्रकरण ताजं असतानाच म्हाडाच्या परीक्षेचा पेपरफुटीचा (MHADA recruitment exam paper leak) प्रकार समोर आला. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपी डॉ. प्रितीश देशमुख (Accused Dr. Priteesh Deshmukh) याच्यासह अन्य दोघांना अटक केली आहे. प्रितीश देशमुख याच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Shocking information revels in search of Mhada exam paper leak case accused home)

महाराष्ट्रात टीईटी परीक्षा घोटाळा?

पोलिसांनी म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार डॉ. प्रितीश देशमुख याच्या घराची झाडाझडती घेतली असता तेथे टीईटीचे 50 ओळखपत्र आढळून आले आहेत. याच्याकडे टीईटीच्या ते चाळीस आपात्र विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे मिळाली आहेत. टीईटीची परीक्षा 21 नोव्हेंबर रोजी झाली होती. टीईटीला परीक्षांसाठी साडेचार लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. प्रश्नसूची आणि उत्तरसूचीमध्ये तफावत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांच्या आक्षेपानंतर tet च्या परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आलेली नाहीये. आता प्रितीश देशमुख याच्या घरी टीईटीची 50 ओळखपत्रे सापडल्याने टीईटी परीक्षेतही घोटाळा झाला का? असा सवाल उपस्थित होत आहे.

वाचा : म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी 'या' खास कोडवर्डचा वापर, ऐकून पोलिसही चक्रावले

म्हाडा पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा

म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी डॉ. प्रितीश देशमुख याच्यासह अन्य दोघांना अटक केली आहे. आरोपींची चौकशी केली असता पेपरफुटी प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. एजंट्सकडून आलेल्या परीक्षार्थींना पास करण्यासाठी मुख्य आरोपी डॉ. प्रितीश देशमुख यानं वेगळंच प्लॅनिंग केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. आरोपीला परीक्षार्थींकडून प्रत्येकी 10 लाख रूपये मिळणार होते. याप्रकरणात राज्यभरातील आणखी 10 एजंट्सची नावं समोर आली असून सायबर पोलीस त्यांचा तपास करत आहेत.

खरंतर, अलीकडेच आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरण राज्यभर गाजलं आहे. हे प्रकरण ताजं असतानाही जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक आणि मुख्य आरोपी देशमुख यानं म्हाडा पेपर फोडण्याचं धाडस केलं. त्यासाठी राज्यभरातील 10 एजंट्सकडून त्याला कोट्यवधी रूपये मिळणार होते. एजंट्सकडून म्हाडाच्या परिक्षेत बसलेल्या परीक्षार्थींना उत्तरपत्रिका चक्क कोरी ठेवण्याचा सल्ला देशमुख यांच्याकडून देण्यात आला होता.

उत्तरपत्रिका तपासणी करत असताना एजंट्समार्फत आलेल्या परिक्षार्थींना ओएमआरशीटमध्ये (उत्तरपत्रिका) थेट गुण देऊन त्यांना पास करण्यात येणार होतं. याप्रकरणी डॉ. प्रितीश देशमुख याच्यासह अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगावराजा, ता. सिंधखेडराजा,जि. बुलढाणा) आणि संतोष लक्ष्मण हरकळ (रा. मिलेनियम पार्क, औरंगाबाद) याला अटक केली आहे.

First published:

Tags: Job, Police, Pune, Scam