मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /MHADA paper leak: म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी खास कोडवर्ड, "घरातले सामान कधी मिळणार?"

MHADA paper leak: म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी खास कोडवर्ड, "घरातले सामान कधी मिळणार?"

म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी खास कोडवर्डचा वापर, ऐकून सर्वच झाले अवाक्

म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी खास कोडवर्डचा वापर, ऐकून सर्वच झाले अवाक्

Mhada Paper leak case, accused used special code word: म्हाडाच्या पेपर फुटीप्रकरणाने एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे, 14 डिसेंबर : आरोग्य विभागाचा पेपर फुटल्यानंतर म्हाडाच्या भरती घोटाळ्याचा पर्दाफाश (MHADA recruitment exam paper leak) करण्यात आला. म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत एक धक्कादायक (Shocking information reveal in MHADA paper leak case)  माहिती समोर आली आहे. संबंधित आरोपी म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी खास कोडवर्ड वापरत होते. त्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. (Accused using special code word for MHADA exam paper leak)

म्हाडाच्या पेपरसाठी कोडवर्ड

घरातील वस्तू कधी मिळणार? याचा अर्थ आहे फुटलेला पेपर कधी मिळणार... खरं नाही वाटत का? हे वाक्य एक कोडवर्ड म्हणून वापरण्यात आलंय. म्हाडाच्या पेपरफुटी प्रकरणासाठी आरोपी आणि उमेदवारांमध्ये झालेल्या संभाषणामध्ये हा कोडवर्ड वापरण्यात आला आहे. घर म्हणजे म्हाडा आणि वस्तू म्हणजे पेपर असा त्याचा अर्थ आहे. पुणे सायबर पोलिसांच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे.

म्हाडाच्या रविवारी होणाऱ्या रद्द झालेल्या परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने जी. ए. सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी या कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख (वय 32, रा. खराळवाडी, पिंपरी-चिंचवड), अंकुश रामभाऊ हरकळ (वय 44, रा. किनगावराजा, सिंदखेडराजा, बुलढाणा), संतोष लक्ष्मण हरकळ (वय 42, रा. औरंगाबाद) यांना अटक केली. दरम्यान, सायबर पोलिसांकडून याबाबत तपास सुरु आहे. या तपासात महत्त्वाची माहिती पुढे आली आहे.

वाचा : "पेपर फोडणारे अद्याप फुटले नाहीत म्हणून पेपर सारखे फुटतात"

पहाटे दोन वाजता उमेदवारांचे फोन अंकुश आणि संतोष हरकळ या यांच्या संपर्कात अनेक उमेदवार होते. विशेषतः शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांना अनेक उमेदवारांचे फोन आले होते. पोलिसांनी त्यांना उमेदवारांशी बोलण्यास सांगितलं तेव्हा अनेक उमेदवार हे घरातील वस्तूचे काय झालं? असा प्रश्‍न त्यांना विचारत होते. उमेदवार नेमक काय विचारताहेत, ते ऐकून पोलीसही चक्रावले होते. याबाबत त्यांनी जेव्हा आरोपींकडे विचारणा केली. तेव्हा, ते वाक्‍य कोडवर्ड असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपींनी स्पष्ट केलीय.

काय म्हणाले पोलीस आयुक्त ?

म्हाडा पेपर रद्द प्रकरणात आत्तापर्यंत तीन जणांना अटक केली असून आणखी तीन जणांना अटक करणार आहे. सर्वांच्या घराची झाडाझडती घेतली आहे. आरोपी आपापसात कोडवर्डमध्ये बोलत असल्याचं तपासात समोर तसंच मोबाइलवर संभाषण करताना कोडवर्डच्या भाषेत बोलायचे. तपासात आणखीन काही पेन ड्राईव्ह सापडले.

वाचा : म्हाडा परीक्षेचा भांडाफोड; मोठे मासे गळाला, पुण्यातून तीन आरोपींना अटक

प्राथमिक तपासात एका विद्यार्थ्यांकडून 12 ते 13 लाख घेतल्याचं समोर आलं आहे. मात्र वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळ्या रक्कम ठरली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात आणखीन काही माहिती समोर आली असून त्यानुसार तपास सुरु आहे.

प्लान बी तयार तयार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही सत्यता असू शकते, पोलीस तपासात आणखी समोर येईल. त्या दृष्टीने आरोपींची चौकशी सुरु आहे. म्हाडा पेपर प्रकरणात 6 जण तर आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणात आत्तापर्यंत 19 जणांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त यांनी दिलीय.

First published:

Tags: Crime, Pune