पुणे, 14 डिसेंबर : प्रियकर (boyfriend ) आपल्या प्रेयसीसाठी (girlfriend ) काय करेल याचा नेम नाही. पुण्यात वैद्यकीय शिक्षण (Medical student) घेणाऱ्या दोन विद्यार्थीनी हौसमौज आणि व्यसनाधिनतेसाठी त्यांनी एकाच दिवशी हडपसर आणि कोथरूडमधील नामांकित ज्वेलर्समधून अंगठ्या (gold rings) चोरून नेल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे, या भावी डॉक्टराने आपल्या प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी ही चोरी केल्याचं उघड झालं आहे. हडपसर पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून अडीच लाखांच्या चार अंगठ्या जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत हनुमंत रोकडे (वय २३ रा. नागोबानगर, लातुर) आणि वैभव संजय जगताप (वय २२ रा. केनवड ता.रिसोड जिल्हा वाशिम) अशी अटक केलेल्या तरुणाची नाव आहे. अनिकेत रोकडे एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात बीएएमएसचे तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्याला गर्लफ्रेंडला अंगठी गिफ्ट करायची होती. तर साथीदार वैभव जगताप हा सुद्धा बीएससी नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्यांना दारूचे व्यसन असून मौजमजेसह मुलींना फिरविण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी त्यांनी 8 डिसेंंबरला हडपसरमधील एका ज्वेलर्समध्ये अंगठ्या खरेदीचा बहाणा केला आणि त्याठिकाणी सेल्समनकडून तीन अंगठ्या पाहण्यासाठी ताब्यात घेतल्या.
#पुणे : गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी चोरल्या सोन्याच्या अंगठ्या pic.twitter.com/acTS2gnGkw
— News18Lokmat (@News18lokmat) December 14, 2021
मात्र, सेल्समन सोन्याचा ट्रे दुसरीकडे ठेवत असल्याची संधी साधून त्यांनी तीन अंगठ्या चोरून नेल्या. पण त्यांची ही हातचलाखी सीसीटीव्हीत कैद झाल्याने सगळा भांडाफोड झाला. या चोरीचा हडपसर पोलीसांनी तपास सुरू केला असता, त्याच दिवशी चोरट्यांनी कोथरूडमधील ज्वेलर्समध्येही अशाच पद्धतीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
केरळच्या आज्जींची वयाच्या 104 व्या वर्षी साक्षरता परीक्षेत बाजी!
तपास पथकाचे पोलीस अंमलदार शाहीद शेख, निखील पवार व प्रशांत दुधाळ यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी चार अंगठ्या चोरीची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, सहायक निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, प्रदीप सोनवणे, गणेश क्षीरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, रियाज शेख, सचिन गोरखे, सुरज कुंभार यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune crime, Pune police