मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यातील विवाहितेसोबत विकृतीचा कळस; नोकरीच्या बहाण्यानं परळीत नेलं अन्...

पुण्यातील विवाहितेसोबत विकृतीचा कळस; नोकरीच्या बहाण्यानं परळीत नेलं अन्...

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Beed: पुण्यातील एका विवाहित महिलेला बीडमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचाराचा (Rape on married woman) कळस गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

बीड, 23 नोव्हेंबर: पुण्यातील एका विवाहित महिलेला बीडमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचाराचा (Rape on married woman) कळस गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणानं परळीत नोकरी देण्याच्या आणि राहण्यासाठी घर देण्याच्या बहाण्यानं (Lure of job and home) पीडित महिलेला बीड जिल्ह्यातील परळी याठिकाणी घेऊन गेला होता. यानंतर आरोपीनं विविध प्रकारची आमिषं दाखवून पीडित महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल (FIR Lodged) होताच पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक (Accused arrested) केली आहे.

गणेश कोडी असं अटक करण्यात आलेल्या 24 वर्षीय तरुणाचं नाव असून तो परळी शहरातील गणेशपार परिसरातील रहिवासी आहे. संशयित आरोपी गणेश यानं 36 वर्षीय विवाहितेला नोकरी देण्याच्या आणि राहण्यासाठी घर देण्याच्या बहाण्यानं फूस लावून परळीत नेलं होतं. याठिकाणी गेल्यानंतर आरोपीनं 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी विवाहितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेनं परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा-'ती' बोलत नाही म्हणून भेटायला बोलावलं, वाद झाला अन् झाडली गोळी, पण....

रविवारी पहाटे बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत संशयित आरोपी गणेश कोडी याला अटक केली आहे. 36 वर्षीय पीडित महिला विवाहित असून ती पुण्यातील रहिवासी आहे. तिचं मूळ गाव सोलापूर आहे. गेल्या काही दिवसांपासून पीडित महिला आर्थिक अडचणीचा सामना करत होती. तिला नोकरीची आवश्यकता होती. पीडितेची गरज लक्षात घेत, आरोपीनं 'तुला नोकरी लावतो, तुला राहण्यासाठी घर देतो' असं सांगून पुण्याहून बीड जिल्ह्यातील परळी याठिकाणी आणलं होतं.

हेही वाचा-अंगावरील हळद उतरण्याआधीच पुसलं कुंकू; लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेवानं दिला जीव

याठिकाणी आरोपीनं पीडितेवर सलग दोन दिवस अत्याचार केला आहे. यापूर्वीही आरोपीनं वेळोवेळी अत्याचार केल्याचं पीडितेनं आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. आरोपी गणेश कोडी याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास परळी शहर पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Beed, Crime news, Rape