Home /News /maharashtra /

पुण्यातील लाल महालमध्ये थिरकली 'चंद्रा', संभाजी ब्रिगेडने घेतला आक्षेप

पुण्यातील लाल महालमध्ये थिरकली 'चंद्रा', संभाजी ब्रिगेडने घेतला आक्षेप

 दोन दिवस लाल महाल सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यातच या गाण्यासाठी परवानगी महापालिकेकडून देण्यात आली होती का याची माहिती पोलिसांनी मागवली

दोन दिवस लाल महाल सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यातच या गाण्यासाठी परवानगी महापालिकेकडून देण्यात आली होती का याची माहिती पोलिसांनी मागवली

दोन दिवस लाल महाल सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यातच या गाण्यासाठी परवानगी महापालिकेकडून देण्यात आली होती का याची माहिती पोलिसांनी मागवली

पुणे, २० मे - सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. पुण्यातला लाल महाल (Lal Mahal Pune) हा लावणीच्या शूटसाठी बंद ठेवल्याने संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. मानसी पाटील (mansi patil), कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी लाल महालात चंद्रमुखी (chandramukhi ) सिनेमातील चंद्रा हे गाणं रेकॉर्ड केलंय. यासाठी दोन दिवस लाल महाल बंद ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणावर संभाजी बिग्रेडने आक्षेप घेतला आहे. लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगरपालिकेने बंद ठेवला आहे. हजारो पर्यटक जिजाऊ-शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. मात्र पुणे महानगरपालिका आणि तिथल्या सुरक्षा रक्षकांकडून लाल महाल बंद ठेवण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे जिजाऊ-शिवरायांच्या लाल महालात रिल्स काढण्याच्या नादात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर मुलींना नाचवले जात आहे. जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत, असा आक्षेप संभाजी ब्रिगेडने घेतला आहे. मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे गाणं त्या ठिकाणी लाल महालात शूट केला आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. जिजाऊ-शिवरायांची अस्मिता म्हणजे तो लाल महाल आहे. हजारो शिवप्रेमी लाल महालात जाऊन नतमस्तक होत असतात. त्याच ठिकाणी लाल महाल बंद असताना चित्रपटाची गाणी चित्रीत करून लाल महाल बदनाम केला जात आहे. या जिजाऊ-शिवरायांनी सोन्याचा नांगर चालून हे पुणे वसवलं, त्याच जिजाऊंच्या लाल महालामध्ये अशा पद्धतीची गाणी चित्रित करणं हे निषेधार्ह आहे. हा लाल महाला चा अवमान आहे. या व्हिडिओ संदर्भात दोन-तीन दिवसापूर्वी मा. पोलिस आयुक्त, मा. मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे. मात्र पोलीस प्रशासन तक्रार दाखल करायला तयार नाही. मात्र आम्ही पाठपुरावा सोडणार नाही. या सर्व लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. (Engineer उमेदवारांनो, इथे मिळेल नोकरी; BEL मध्ये 'या' पदांसाठी Vacancy; करा अर्ज) दरम्यान, मानसी पाटील कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी लाल महालात चंद्रमुखी सिनेमातील चंद्रा हे गाणं रेकॉर्ड केलंय त्यासाठी दोन दिवस लाल महाल सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यातच या गाण्यासाठी परवानगी महापालिकेकडून देण्यात आली होती का याची माहिती पोलिसांनी मागवली आहे. महापालिकेच्या ताब्यात लाल महाल असताना अश्या प्रकारे गाण्याच्या शुटिंग साठी तो बंद ठेवण्यात येत असेल आणि शिवाजी महाराजांना जिथे जिजाबाईंनी घडवलं तिथं असे प्रकार घडत असतील तर याच्या पाठीमागे कोण आहे, असा सवाल संभाजी ब्रिगेडने विचारला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या