मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुणे: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी YouTube वर व्हिडिओ पाहिला, मग प्रेयसीच्या घरात घुसला अन्.., तरुणाचं धक्कादायक कृत्य

पुणे: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी YouTube वर व्हिडिओ पाहिला, मग प्रेयसीच्या घरात घुसला अन्.., तरुणाचं धक्कादायक कृत्य

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सुमितकडून सुमारे 14 लाख रुपयांचे दागिने तसंच परकीय चलन जप्त करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सुमितने युट्युबवर व्हिडीओ बघून ही चोरी केली आहे. 

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

पुणे 08 ऑक्टोबर : नात्यात दुरावा आला की अनेकदा लोक बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात. पुण्यातून अशीच एक घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्हीही थक्क व्हाल. यात एका प्रियकराने प्रेयसीचा बदला घेण्यासाठी अतिशय अजब प्रकार केला. प्रेयसीसोबत झालेल्या ब्रेकअपच्या रागातून प्रियकरांनं चक्क प्रेयसीच्या घरातच चोरी केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी सुमित परदेशी याला पोलिसांनी अटक केली आहे.

Instagram च्या फॉलोअर्सवरुन घडला भयानक प्रकार, तरुणीने दिले चॅलेंज अन् दोघांचा बळी

सुमितकडून सुमारे 14 लाख रुपयांचे दागिने तसंच परकीय चलन जप्त करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सुमितने युट्युबवर व्हिडीओ बघून ही चोरी केली आहे.  आंबेगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत सुमितचे प्रेमसंबंध होते. मात्र मागील काही दिवसात त्यांच्यामध्ये वाद झाला होता. प्रेयसी दुसऱ्या कुणाशी तरी बोलत असल्याचं लक्षात आल्यानंतर सुमित संतापला.

प्रेयसीला धडा शिकवण्याच्या उद्देशानं त्यानं प्रेयसीच्या राहत्या घरातच घरफोडी केली. घरात चोरी झाल्याने याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यातून सुमितनेच ही चोरी केली असल्याचं उघडकीस आलं.

मुंबई: पतीच्या प्रेयसीची हत्या करून मृतदेहाची लावली विल्हेवाट, पण रिक्षाचालकाने सगळं पाहिलं अन्...

प्रेयसी घरी नसताना डुप्लिकेट चावीने घर उघडून त्याने ही चोरी केली आहे. यापूर्वी त्याच्या नावावर कोणताही गुन्हा नाही. त्याने केवळ ब्रेकअपच्या रागातून प्रेयसीवर राग काढण्याच्या उद्देशाने हा कारनामा केला असल्याने हे प्रकरण ऐकून पोलीसही चक्रावून गेले.

First published:

Tags: Crime news, Thief