पुणे, 06 ऑगस्ट : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येत असलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर 1 च्या परीक्षेवेळी एका परीक्षार्थीने गैरप्रकार केला. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित परीक्षार्थीवर आयोगाकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली. याबाबत आयोगाने ट्विट करून माहिती दिली आहे.
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर 1 करिता आज रोजी आयोजित परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यामध्ये पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसिंगे या परीक्षार्थीकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन व ब्लूटूथ इअर फोन इत्यादी साहित्य सापडले. सदर उमेदवारावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर 1 करीता आज रोजी आयोजित परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) August 6, 2022
सदर परीक्षेमध्ये अत्याधुनिक उपकरणाच्या आधारे गैरप्रकाराचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार आयोगाच्या दक्षता पथकाने अचानकपणे संबंधित संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यात संबंधित उमेदवाराकडे आक्षेपार्ह साहित्य आढळले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, असे आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी सांगितले.
हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत
आज मुख्य परीक्षेमध्ये पकडला गेला, पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा ह्याने अश्या प्रकारे गैरप्रकार केला आहे का? ह्याची पण चौकशी व्हायला पाहिजे. तसेच मोबाईलमध्ये बाहेरून कोणी उत्तरे सांगणारा होता त्याला पण अटक व्हावी, अशी मागणी एका रुपेश नावाच्या ट्विटर अंकाऊटवरून करण्यात आली आहे. कायदेशीर कार्यवाही सोबतच सखोल चौकशी व्हायला पाहिजे. हे रॅकेट खूप मोठं आहे, असंही काहींचे म्हणणे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Exam, Mpsc examination, Pune news