Home /News /maharashtra /

पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला मोठा अपघात; एकाचा मृत्यू, 28 जणं जखमी!

पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला मोठा अपघात; एकाचा मृत्यू, 28 जणं जखमी!

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

हा अपघात इतका मोठा होता की. वारकरी ट्रॉलीतून बाहेर फेकले गेले आणि रस्त्यावर पडले.

    पुणे, 19 जून : रविवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारात पुणे-बंगळुरू (Pune News) हायवेवर वारकऱ्यांच्या गाडीला मोठा (Big Accident) अपघात झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा अपघात इतका मोठा होता की. वारकरी ट्रॉलीतून बाहेर फेकले गेले आणि रस्त्यावर पडले. या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला असून तब्बल 28 वारकरी जखमी झाले आहेत. कोल्हापुर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे येथे हा अपघात घडला. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना शिरवळ येथील पुणे बस थांब्यावर दिंडीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून भाजीपाला घेऊन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. हे वारकरी भदोले , लाहोटे कोल्हापूर येथून आळंदी पुण्याला निघाले होते. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव मायाप्पा कोंडीबा माने ( रा.भादोले, ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर) असे आहे. तर मारुती भैरुनाथ कोळी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर शिरवळच्या जोगळेकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिंगोली शहरात आज सायंकाळी संत नामदेव महाराजांच्या पालखीचे आगमन होताच भव्य स्वागत करण्यात आले. शहरातील ऐतिहासिक रामलीला मैदानावर संत नामदेव महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. या सोहळ्यात अश्वांचे रिंगण हे हिंगोलीकरांसाठी पर्वणी ठरले. या सोहळ्यात वारकरी व आबालवृद्धांनी फुगड्या खेळून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. आज संत नामदेवांच्या पालखीचा हिंगोली शहरात मुक्काम असून सकाळी पालखी औंढा नागनाथकडे प्रस्थान करणार आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Accident, Pune

    पुढील बातम्या