मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवण्याचा दिला होता सल्ला; म्हाडा पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा

उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवण्याचा दिला होता सल्ला; म्हाडा पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा

आरोग्य भरती पेपरफुटीचं प्रकरण ताजं असताना, म्हाडा पेपर फुटीप्रकरणानं (MHADA recruitment exam fraud) राज्यातील वातावरण तापलं आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

आरोग्य भरती पेपरफुटीचं प्रकरण ताजं असताना, म्हाडा पेपर फुटीप्रकरणानं (MHADA recruitment exam fraud) राज्यातील वातावरण तापलं आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

आरोग्य भरती पेपरफुटीचं प्रकरण ताजं असताना, म्हाडा पेपर फुटीप्रकरणानं (MHADA recruitment exam fraud) राज्यातील वातावरण तापलं आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

पुणे, 15 डिसेंबर: आरोग्य भरती पेपरफुटीचं प्रकरण ताजं असताना, म्हाडा पेपर फुटीप्रकरणानं (MHADA recruitment exam fraud) राज्यातील वातावरण तापलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी डॉ. प्रितीश देशमुख याच्यासह अन्य दोघांना अटक (3 accused arrested) केली आहे. आरोपींची चौकशी केली असता पेपरफुटी प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. एजंट्सकडून आलेल्या परीक्षार्थींना पास करण्यासाठी मुख्य आरोपी डॉ. प्रितीश देशमुख यानं वेगळंच प्लॅनिंग केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. आरोपीला परीक्षार्थींकडून प्रत्येकी 10 लाख रूपये मिळणार होते. याप्रकरणात राज्यभरातील आणखी 10 एजंट्सची नावं समोर आली असून सायबर पोलीस त्यांचा तपास करत आहेत.

खरंतर, अलीकडेच आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरण राज्यभर गाजलं आहे. हे प्रकरण ताजं असतानाही जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक आणि मुख्य आरोपी देशमुख यानं म्हाडा पेपर फोडण्याचं धाडस केलं. त्यासाठी राज्यभरातील 10 एजंट्सकडून त्याला कोट्यवधी रूपये मिळणार होते. एजंट्सकडून म्हाडाच्या परिक्षेत बसलेल्या परीक्षार्थींना उत्तरपत्रिका चक्क कोरी ठेवण्याचा सल्ला देशमुख यांच्याकडून देण्यात आला होता.

उत्तरपत्रिका तपासणी करत असताना एजंट्समार्फत आलेल्या परिक्षार्थींना ओएमआरशीटमध्ये (उत्तरपत्रिका) थेट गुण देऊन त्यांना पास करण्यात येणार होतं. याप्रकरणी डॉ. प्रीतीश देशमुख याच्यासह अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगावराजा, ता. सिंधखेडराजा,जि. बुलढाणा) आणि संतोष लक्ष्मण हरकळ (रा. मिलेनियम पार्क, औरंगाबाद) यांना अटक केली आहे.

हेही वाचा-सेक्ससाठी नकार दिल्याने गाठला क्रूरतेचा कळस, पत्नीला जिवंतपणीच दिल्या नरक यातना

खरंतर, म्हाडाची लेखी परिक्षा आयोजित करून त्याच्या निकालापर्यंत सर्व कामाचे कंत्राट पुण्यातील जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आलं होतं. या कंपनीचा संचालक देशमुख आहे. या गोष्टीचा गैरफायदा घेत देशमुख याने राज्यभरातील एजंट्सशी संपर्क साधून गुण वाढवून देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी 10 लाखांची डील केली होती. त्यावरील रक्कम एजंट स्वीकारणार होते.  आगाऊ पैसे देणाऱ्या परीक्षार्थींना उत्तरपत्रिका चक्क कोऱ्या ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता.

हेही वाचा-डोळ्यात मिरची पूड टाकत लोखंडी रॉडने घातले घाव; अनैतिक संबंधातून BF चा खेळ खल्लास

परीक्षा झाल्यानंतर संबंधित उत्तरपत्रिका आरोपी देशमुख याच्या जी. एस. सॉफ्टवेअर कंपनीच्या ताब्यात देण्यात येणार होत्या. त्यानंतर परीक्षार्थींना जास्त गुण देऊन त्यांना पास केलं जाणार होतं. मात्र, पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांमुळे त्याचा डाव उधळला आहे. राज्यभरातील 10 एजंट पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत. पुणे सायबर पोलिसांना आतापर्यंत राज्यातील 10 एजंट्सची माहिती मिळाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक मीनल पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune