Home /News /maharashtra /

ST Bus @75 : महाराष्ट्राची 'लालपरी' झाली 75 वर्षांची; लाकडी ते इलेक्ट्रीक बसपर्यंतचा STचा प्रवास  

ST Bus @75 : महाराष्ट्राची 'लालपरी' झाली 75 वर्षांची; लाकडी ते इलेक्ट्रीक बसपर्यंतचा STचा प्रवास  

title=

1948साली पुणे-अहमदनगर महामार्गावर पहिल्यांदा एसटी बस धावली होती. या पहिल्या एसटी बस ते आत्ताच्या इलेक्ट्रॉनिक एसटीपर्यंतचा प्रवास अतिशय रंजक आहे.

    पुणे, 1 जून : महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एसटी बस (ST Bus) ही तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही लालपरी म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) बस आपल्या सर्वांच्या सेवेत रुजू आहे. या लालपरीसोबत मागील तीन पिढ्यांच्या आठवणी आहेत. मागच्या तीन पिढ्यांपासून महाराष्ट्राची ही लाडकी लालपरी आज तब्बल 75 वर्षांची (ST Bus @75) झाली आहे. जाणून घेऊया, या लालपरीचा आतापर्यंतचा रंजक असा प्रवास. (Lalpari Journey) पहिली बस कधी आणि कोणत्या मार्गावर धावली? महाराष्ट्राची लाडकी लालपरी म्हणजेच एसटी आज 75 वर्षांची झाली आहे. 1948साली पुणे-अहमदनगर महामार्गावर पहिल्यांदा एसटी बस धावली होती. या पहिल्या एसटी बस ते आत्ताच्या इलेक्ट्रॉनिक एसटीपर्यंतचा प्रवास अतिशय रंजक आहे. पहिली एसटी बस ही निळ्या रंगाची लाकडाची होती आणि तिचे छप्पर कापडी होते. या बसचे तिकीट काही पैशांमध्ये होते. पहिली बस 1 जून 1948 रोजी पुणे ते अहमदनगर मार्गावर धावली. त्या एसटीत एकूण 30 प्रवाशांची क्षमता होती. यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या फियाट, लेलँड, स्टडेबेकर, फोर्ड, सेडान, अल्बिओन, मॉरिस कमर्शिअल, शेवरले, या कंपन्यांच्या गाड्या ताफ्यात शामिल झाल्या. सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा मार्फत साधारण 31 विभागांतून 15,500 बसेस ताफ्यात आहेत. शिवनेरी, अश्वमेध, शिवशाही, शितल आणि आता शिवाई इलेक्ट्रिक एसटीच्या आरामदायी बसेस देखील महामंडळाने सुरू केलेल्या आहेत. एसटीमध्ये मोफत वाय-फायची देखील सोय करण्यात आली आहे. तसेच तिकीट सुविधा देखील आता ऑनलाईन झाली आहे. हेही वाचा - Singer KK Car collection: आलिशान कारचा शौकीन होता KK, गायकाच्या महागड्या कारचं कलेक्शन; नुकतीच घेतली होती 'ही' महागडी कार
    एसटीच्या 75व्या वर्धापनदिनानिमित्त शिवाई ही इलेक्ट्रिक एसटी बस आता सुरू झाली आहे. ज्या मार्गावरून पहिली एसटी धावली होती, त्याच पुणे- अहमदनगर महामार्गावर ही नवीन बस धावणार आहे. लालपरी ही सर्वसामान्यांची लाडकी गाडी म्हणून ओळखली जाते. अनेकांच्या सुंदर आठवणी या एसटीसोबत अनेकांच्या आहेत. मध्यंतरी कर्मचाऱ्यांचा संप आणि कोरोना कालखंडामध्ये एसटी तोट्यात होती. मात्र, पुन्हा एसटी या सर्वातून बाहेर पडून उभारी घेत आहे.
    First published:

    Tags: Pune, St bus

    पुढील बातम्या