Home /News /maharashtra /

Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा पाऊस, पुढचे काही तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा पाऊस, पुढचे काही तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा इशारा

गेल्या आठवड्याभरापासून राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. काही ठिकाणी उकाडादेखील वाढताना दिसत आहे. पण हा उकाडा आता जास्त वेळ टिकणार नाही.

  पुणे, 3 ऑगस्ट : राज्यात जुलै महिन्यात प्रचंड पाऊस कोसळला. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं. गडचिरोलीत तर प्रचंड मोठा महापूर आल्याचं दृश्य होतं. तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं होतं. पण गेल्या आठवड्याभरापासून राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. काही ठिकाणी उकाडादेखील वाढताना दिसत आहे. पण हा उकाडा आता जास्त वेळ टिकणार नाही. कारण राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही भागांमध्ये पुढच्या काही तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे तीन ते चार तास महत्त्वाचे आहेत. कारण पुढच्या काही तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, रायगड, उस्मानाबाद, औरंगाबाद, नाशिक, जालना, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी जोरात वारे वाहण्याची शक्ता आहे. काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (ठाकरे विरुद्ध शिंदे, गुरूवारी पहिला सामना, सत्तानाट्यानंतरची पहिलीच निवडणूक)
  पुण्यात घाट परिसरात पावसाचा इशारा
  हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. पण लगेच घाबरुन जाण्याची गरज नाहीय. कारण हा पाऊस शहरी भागात पडणार नाहीय. पुण्यातील घाट परिसरात पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून त्याबाबत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यासाठी पुढचे पाच दिवस महत्त्वाचे दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता पुन्हा एकदा राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना पुढचे 5 दिवसासांठी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तोवर आरोग्याची काळजी घ्या व स्वतःला हायड्रेट ठेवा, असे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.
  Published by:Chetan Patil
  First published:

  पुढील बातम्या