Home /News /maharashtra /

'मला जर पुरस्कृत हळद दिली असती तर हा खेळखंडोबा झाला नसता'; राजकीय भूकंपात संभाजीराजेंचीही उडी

'मला जर पुरस्कृत हळद दिली असती तर हा खेळखंडोबा झाला नसता'; राजकीय भूकंपात संभाजीराजेंचीही उडी

संभाजीराजेंचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

    पुणे, 22 जून : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे संकेत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा (Maharashtra Political Crisis) प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने असं राऊतांनी ट्विटरवरुन म्हटलंय. यावर छत्रपती संभाजीराजे म्हणाले, की जर मला उमेदवारी दिली असती तर एवढा खेळखंडोबा झाला नसता, असं विधान यावेळी संभाजीराजे यांनी केलं आहे. जे कोणाची सरकार येईल त्याने सामान्य माणसाचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि समाजातील प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं. राज्यात जे 15 ते 20 दिवसात घडतय, ते बरोबर झालेलं नाही. जर मला पुरस्कृत हळद दिली असती तर आज जो खेळखंडोबा झाला आहे तो झाला नसता असं यावेळी संभाजीराजे यांनी म्हटल आहे. काय आहे प्रकरण? राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election) सहावी जागा अपक्ष लढणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी जाहीर केलं होतं. त्यासोबतच राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी पत्रही लिहिलं होतं. त्यानंतर शिवसेनेने सुद्धा या जागेवर निवडणूक लढण्याचं जाहीर केलं. त्यासोबतच संभाजीराजे यांना शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची ऑफर दिली. पण संभाजीराजेंकडून कुठलीच प्रतिक्रिया न आल्याने अखेर शिवसेनेने कोल्हापुरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी देण्यात आली होती. भाजपसह महाविकास आघाडीतील आमदारांचा संभाजीराजेंना पाठिंबा होता. संभाजीराजे यांच्या विरोधात उमेदवार देण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला शिवसेनेतल्या आमदारांनेच विरोध केला होता. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून राजेंनी उमेदवारी करावी हा देखील पर्याय देण्यात आला होता. मात्र यावेळी संभाजीराजे पत्रकार परिषद घेत म्हणाले की, राजे.. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची. पण घोडे बाजार होणार... घोडेबाजारसाठी माझी उमेदवारी नाहीये. निष्कलंक माझं व्यक्तिमत्व आहे. निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून मी उमेदवारी अर्ज भरणार नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Pune, Sambhajiraje chhatrapati

    पुढील बातम्या