मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेपूर्वी मनसेला शिवसेनेचा 'दे धक्का', मनसेचे निलेश माझिरे शिवसेनेच्या वाटेवर?

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेपूर्वी मनसेला शिवसेनेचा 'दे धक्का', मनसेचे निलेश माझिरे शिवसेनेच्या वाटेवर?

Raj Thackeray rally in Pune: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 22 मे रोजी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. मात्र, त्यापूर्वी मनसेला धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे.

Raj Thackeray rally in Pune: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 22 मे रोजी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. मात्र, त्यापूर्वी मनसेला धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे.

Raj Thackeray rally in Pune: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 22 मे रोजी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. मात्र, त्यापूर्वी मनसेला धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे.

पुणे, 20 मे : मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सभांचा धडाका लावला आहे. त्यानंतर आता राज ठाकरेंची पुण्यात जाहीर सभा (Raj Thackeray Rally in Pune) होत आहे. 22 मे रोजी ही जाहीर सभा होणार आहे. मात्र, त्यापूर्वी मनसेला एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझिरे (Nilesh Majhire) यांनी शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांची भेट घेतली आहे. तसेच निलेश माझिरे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेआधी निलेश माझिरे हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच झाल्यास हा मनसेसाठी एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

काही महिन्यांपूर्वी मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या हाती घेतलं. त्यानंतर गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यावर पुण्यातील वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर वसंत मोरे यांची शहराध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं. तेव्हापासून वसंत मोरे हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझिरे आणि त्यांचे समर्थक हे सुद्धा पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत.

पुण्यात 'राज'गर्जना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार की नाही याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे. कारण, राज ठाकरेंची सभा पुण्यात होणारच असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुण्यात येत्या 22 तारखेला ही सभा होणार अशी माहिती मनसेनं दिली आहे

राज ठाकरे यांची सभा 22 तारखेला 10 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे होणार आहे, अशी माहिती मनसेचे प्रवक्ते हेमंत संभुस यांनी दिली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेबाबत निर्माण झालेला गोंधळ अखेर शमला आहे.

पुण्यात मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळालं. शिवाजीनगरचे मनसे पदाधिकारी यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं रुपांतर चक्क झटापटीत झालं असल्याचं समोर आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या संदर्भात आयोजित बैठकीत निमंत्रण न दिल्याने मनसे पदाधिकाऱ्यांत वाद झाला. शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, चक्क झटापटही झाली.

रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष असुन कुठल्याच बैठकांना का बोलावत नाही याचा जाब शैलेश विटकर यांनी बैठकीत विचारला. यानंतर संतापलेले रणजित शिरोळे हे अंगावर धावून गेले. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली.

पुणे शहराध्यक्ष आणि मनसेच्या सर्व नेत्यांसमोर हा वाद झाला. अयोध्या दौऱ्यासंबंधी नावनोंदणी आणि सभेच्या नियोजनाच्या बैठकी दरम्यान हा वाद झाला. या प्रकारामुळे मनसेची गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

First published:

Tags: MNS, Pune, Raj Thackeray, Shiv sena