Home /News /maharashtra /

Shivai Electric ST: पुणे-नगर प्रवास गारेगार; पहिली इलेक्ट्रिक ST धावली, का आहे शिवाई बस खूपच खास, वाचा

Shivai Electric ST: पुणे-नगर प्रवास गारेगार; पहिली इलेक्ट्रिक ST धावली, का आहे शिवाई बस खूपच खास, वाचा

Shivai ST: पुणे-नगर प्रवास गारेगार; पहिली इलेक्ट्रिक ST धावली, काय आहे खास, वाचा

Shivai ST: पुणे-नगर प्रवास गारेगार; पहिली इलेक्ट्रिक ST धावली, काय आहे खास, वाचा

Shivai Electric ST bus: पुणे ते अहमदनगर या मार्गावर राज्यातील पहिली इलेक्ट्रिक एसटी आजपासून सुरू झाली आहे.

पुणे, 1 जून : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एमएसआरटीसीची (MSRTC) लाल परी म्हणून ओळख आहे. एसटीची (ST Bus) लाल परी आपल्याला संपूर्ण राज्यभरात सेवा देते. पण आता ही लाल परी वेगळ्या रुपात रस्तयावर उतरली आहे. कारण, एसटी महामंडळाकडून आता पहिली इलेक्ट्रिक बस (First Electric ST bus) रस्त्यावर उतरली आहे. या बसचे नाव 'शिवाई' (Shivai first electric ST) असे असून ती संपूर्ण पणे वाताणुकूलीत अशी आहे. राज्यातील पहिली एसटी 1 जून 1948 रोजी धावली. नगर - पुणे - नगर या मार्गावर ही एसटी बस धावली होती. त्याच धर्तीवर पहिली इलेक्ट्रिक एसटी सुद्धा पुणे - अहमदनगर या मार्गावर आजपासून धावण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा अमृतमहोत्सवी पदार्पण सोहळा आणि विद्युत प्रणालीवर आधारित बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास परिवहन मंत्री अनिल परब, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, महामंडळाचे आयुक्त शेखर चन्ने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. वाचा : मविआतील वाद चव्हाट्यावर; मुंबईतील वॉर्ड रचनेवरुन काँग्रेसचा शिवसेनेवर गंभीर आरोप शिवाई बसची वैशिष्ठ्ये शिवाई बस ही विद्युत घटावर चालणारी आहे. त्यामुळे बस प्रदूषण विरहित, पर्यावरणपूरक आणि आवाज विरहित आहे. आकर्षक रंगसंगतीमध्ये शिवाई असे ब्रँड नेम देण्यात आले आहे. बस एकदा चार्ज केल्यानंतर जास्तीत जास्त 250 कि.मी. पर्यंत बस जाऊ शकते. शिवाई बस वातानुकूलित आहे. प्रत्येक प्रवाशांसाठी स्वतंत्र आणि स्वनियंत्रित एसी लुव्हर बसवण्यात आले आहेत. त्यासोबतच वाचण्यासाठी स्वतंत्र रिडिंग लॅम्प देण्यात आले आहेत. शिवाई बस 12 मीटर लांबीच्या चासीसवर बांधण्यात आली आहे. तिची रुंदी 2.6 मीटर आणि उंची 3.6 मीटर इतकी आहे. शिवाई बसमध्ये 43 प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था असून प्रवासी सीट हे पुश बॅक प्रकारचे देण्यात आले आहेत. या बसची चासीस ही मोनोकॉक प्रकारची असल्याने चासीसखाली बसच्या मधोमध प्रशस्त असे सामान कक्ष देण्यात आले आहे. प्रत्येक दोन सीटच्यामध्ये दोन्ही प्रवाशांचे मोबाइल चार्जिंगसाठी स्वतंत्र यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. बैठक व्यवस्थेत प्रत्येक प्रवाशांसाठी लोड सेन्सर बसवण्यात आले आहेत. चालक केबिनमध्ये रिअल टाईम अल्कोहोल सेन्सर बसवण्यात आले आहेत. बसच्या आतील हवेची गुणवत्ता, आर्दता आणि तापमान मोजण्यासाठीची यंत्रणा चालक केबिनमध्ये सर्व प्रवाशांना दिसेल अशी बसवण्यात आली आहे. चालकाच्या सहाय्याने अत्याधुनिक पद्धतीची Advance Driving Assistance System आणि Driver Status Monitoring System बसवण्यात आले आहे. चालक केबिनमध्ये प्रवाशी अनाऊन्सिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सावध करण्यासाठी बल्कहेड पार्टिशनवर हुटर बसवण्यात आला असून त्याचे बटन चालक कक्षात देण्यात आले आहे. प्रवासी कक्षातील हालचालींवर देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरा प्रवाशी कक्षात बसवण्यात आले आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाला ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, एखादी सेवा जी आपण रोज बघतो, तिचा वापर करतो तेंव्हा ती किती वर्षाची झाली याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. आपल्या एसटीची 75 वर्षे अशीच आहेत. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. आपल्या एस.टी ची सुरुवात ही 1948 साली झाली. पहिली एस.टी कशी होती, तिचं रंगरूप आकार कसं होतं हे आज आपण चित्रफितीच्या माध्यमातून पाहिलं. आपली एस.टी काळानुरुप किती बदलली हे यातून दिसलं. एस.टीची ही वाटचाल पुण्यात सुरु झाली आणि एसटीचा आजचा अमृतमहोत्सवी कार्यक्रमही पुण्यात होत आहे हा एक योगायोग आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं, मागील काही महिने एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन शासनाकडून दिलं आणि पुढच्या काही वर्षाची हमी शासनाने घेतली आहे. सर्व करता येतं पण पैशांचे सोंग आणता येत नाही. एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे -जे करणं शक्य आहे ते केलं आणि यापुढेही करणारच. त्यात कुठेही मागेपुढे पहाणार नाही. राज्यातील रस्ते आता चांगले होत आहेत. पर्यावरणपूरक वाहनं सर्वात जास्त असणारी मुंबई हे पहिलं शहर ठरणार आहे. एसटीत सुद्धा हा प्रयोग आपण करत आहोत. एसटी सेवा प्रदुषणविरहित कशी होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे, तसा आपला प्रयत्न असणार आहे. एसटी सुधारणांसाठी नवीन संकल्पना आणतो आहोत. काळ बदलतो तसं तंत्रज्ञान बदलतं, गरजा बदलत आहेत. या बदलाप्रमाणे प्रगती करणं आपल्या सर्वांचे उद्दिष्ट आहे. एस.टी कर्मचारी- तुम्ही-आम्ही, राज्यातील जनता सर्व एका कुटुंबातील सदस्य आहोत. कुटुंबातील सर्वांना सुखात आणि आनंदात ठेवणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आपण एक आहोत, आपण एकजुटीने जनसेवेचा वसा पुढे चालू ठेऊ या.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ahmednagar, Electric vehicles, Pune, St bus

पुढील बातम्या