मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maha Gram Panchayat election 2022 : 'बारामती' जिंकायला निघालेल्या भाजपला जोरदार धक्का, पवारांच्या गडाला सुरूंग नाहीच!

Maha Gram Panchayat election 2022 : 'बारामती' जिंकायला निघालेल्या भाजपला जोरदार धक्का, पवारांच्या गडाला सुरूंग नाहीच!

Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule

Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule

पवारांच्या सत्ताकेंद्राला सुरूंग लावण्यासाठी दोन केंद्रीय मंत्री बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहेत, मात्र दरम्यान झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्हा आपलाच असल्याच राष्ट्रवादीने दाखवून दिलं आहे.

पुणे, 19 सप्टेंबर : पवारांच्या सत्ताकेंद्राला सुरूंग लावण्यासाठी दोन केंद्रीय मंत्री बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहेत, मात्र दरम्यान झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्हा आपलाच असल्याच राष्ट्रवादीने दाखवून दिलं आहे. निकाल लागलेल्या 61 ग्रामपंचायतींपैकी केवळ 8 जागांवर भाजपला यश मिळालंय, तर राष्ट्रवादीने जवळपास 45 ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज केली आहे. शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात शिरण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. बारामती आणि शिरूर लोकसभा मतदार संघात केंद्र सरकारच्या मंत्र्यांना दौऱ्यासाठी पाठवलं आहे. मोठा कार्यक्रम आखण्यात आलाय, पण आज आलेल्या ग्रामपंचायत निकालात या दोन्ही मतदारसंघातील ग्रामपंचायतीवर पवारांच्या राष्ट्रवादीने वरचष्मा कायम ठेवला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि भोरमधील निकाल शिरूर लोकसभा मतदारसंघातील तीन तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीची सरशी जुन्नर तालुक्यातील एकूण 36 ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदाच्या निवडणूक मोजणी आज जुन्नर येथील कोंडाजीबाबा डेरे आश्रम येथे पार पडली. या पैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर आदिवासी भागातील 33 ग्रामपंचायती पैकी 4 ग्रामपंचायतीमध्ये आशाताई बुचके यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आली. एकुण ग्रामपंचायत-36 भाजप-4 एनसीपी आणि इतर- 32 आंबेगाव : सर्वाधिक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यात 18 ग्रामपंचायती पैकी 14 ग्रामपंचायती NCP च्या ताब्यात आल्या आहेत. तर शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याकडे 3 ग्रामपंचायती, भाजपच्या ताब्यात 1 ग्रामपंचायत आली आहे. विशेष म्हणजे इथे शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. शिवसेनेच्या ताब्यात एकही ग्रामपंचायत आली नाहीये. आंबेगाव एकुण ग्रामपंचायत-18 शिवसेना - 00 शिंदे गट - 02 भाजप- 01 राष्ट्रवादी- 15 काँग्रेस- 00 खेड : भाजपकडे एकही ग्रामपंचायत नाही तालुक्यात 5 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 1 बिनविरोध झाली, तर 4 ठिकाणी निवडणूक झाली त्यात राष्ट्रवादीला 1, शिवसेनेकडे 1 आणि अपक्षांकडे 2 ग्रामपंचायतीची सत्ता आली. इथे भाजपला एकही ग्रामपंचायत मिळाली नाही. कोयाळी - अपक्ष रोहकल - शिवसेना चिखलगाव - NCP खरपुड - अपक्ष दरकवाडी - अपक्ष बारामती लोकसभा मतदारसंघात भोर: दोन्ही ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे भोर तालुक्यात 2 ग्रामपंचायत निवडणूक निकालात दोन्ही निकाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने लागलेत. हे निकाल पाहता पवारांच्या सत्ताकेंद्रात ताकद वाढवण्यासाठी भाजपला आणखी बरीच मेहनत घ्यायला लागणार आहे. साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष अशी हेटाळणी होत असताना हे जिल्हे मात्र पवारांच्या सोबतच असल्याचं दिसून येतंय.
First published:

Tags: Baramati, BJP, NCP, शरद पवार. sharad pawar

पुढील बातम्या