Home /News /maharashtra /

भीमाशंकर अभयारण्यातून बिबट्या हद्दपार, जंगल सोडून वळला शेताकडे!

भीमाशंकर अभयारण्यातून बिबट्या हद्दपार, जंगल सोडून वळला शेताकडे!

बिबट्या हा जंगलातला प्राणी मात्र बागायती भागात अन्न, पाणी आणि निवारा मिळू लागला. त्यामुळे...

बिबट्या हा जंगलातला प्राणी मात्र बागायती भागात अन्न, पाणी आणि निवारा मिळू लागला. त्यामुळे...

बिबट्या हा जंगलातला प्राणी मात्र बागायती भागात अन्न, पाणी आणि निवारा मिळू लागला. त्यामुळे...

भीमाशंकर, 20 मे : पुणे (pune) जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्यात (bhimashankar wildlife sanctuary) बुद्ध पौर्णिमा (buddha purnima 2022) आणि त्यानंतर एक दिवस अशी दोन दिवसांची प्राणीगणना झाली. यामध्ये अभयारण्यातून बिबट्या (leopard) हद्दपार झाल्याचे समोर आलं आहे. तर हरीण जातीचे भेकर,माकड आणि सांबरांच्या संख्येत वाढ झाली आहे. भीमाशंकर अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी ८ पानवठयानच्या ठिकाणी हौशी निसर्गप्रेमी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची पाहणी व निरीक्षण केले यामध्ये सर्व ठिकाणी भेकर व सांबर पाहायला मिळाले. दिनांक 16 व 17 मे रोजी वन विभागाने पनस्थळांवरील प्राणी पाहणे व निसर्ग अनुभव कार्यक्रम घेतला. यामध्ये 20 वनकर्मचारी बरोबर 25 निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला. उन्हाळ्यात जंगलात पाणी कमी ठिकाणी शिल्लक राहते आणि पौर्णिमेच्या प्रकाशात पाणवठ्यावर येणारे प्राणी स्पष्ट दिसतात म्हणून हा प्राणी निरीक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो. भीमाशंकर जंगलातील चौरा, वीरतले,भाकादेवी,वाजेवाडी,घाटघर,उघडी कलमजाई,करवीचादरा या ठिकाणी असलेल्या त्यांच्या जागी माचन तयार करून हे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये तेरा सांबर आणि सात भेकर तसेच काळा तोंडाची वानर, मोर, ससे, रानकोंबडे, उदमांजर खवले मांजर, शेकरू आढळून आले. मात्र कोठेही बिबट्याचे अस्तित्व व खुणा आढळल्या नाहीत. बिबट्या हा जंगलातला प्राणी मात्र बागायती भागात अन्न, पाणी आणि निवारा मिळू लागला, त्यामुळे बिबट्या जंगल सोडून उसाच्या शेतीकडे वळला. त्यामुळे भीमाशंकर जंगलात त्याचे अस्तित्व राहिले नाही. भीमाशंकर जंगलातील वीरतळे, घाटघर, चौरा याठिकाणी भेकार व सांबर मोठ्या संख्येने दिसले तसेच इतर ठिकाणीही त्यांचे अस्तित्व आढळून आले. एकंदरीत एक रात्र राबवलेल्या या उपक्रमात भीमाशंकरमध्ये भेकर सांबर यांची संख्या समाधानकारक असल्याचे आढळून आले आहे. भीमाशंकर अभयारण्य शेकरूसाठी प्रसिद्ध आहे त्यांची गणना वेगळ्या पद्धतीने जून महिन्यात केली जाणार असल्याचे वनक्षेत्रपाल तुषार चव्हाण यांनी सांगितलं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या