पुणे, 08 डिसेंबर: अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low Pressure area) गेली काही दिवस महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जोरदार पाऊस कोसळला (heavy rainfall in maharashtra) आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात (bay of bengal) निर्माण झालेल्या 'जवाद' चक्रीवादळाचा (Cyclone Jawad) भारताच्या पूर्व किनारपट्टी चांगलाच फटका बसला आहे. पण गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात पाऊस पूर्णपणे थांबला आहे.
पण नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा सरल्यानंतर देखील राज्यात अपेक्षित थंडी पडली नाही. पण आता हळुहळू थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर याठिकाणी सर्वात कमी तापमानाची नोंद (temperature in maharashtra) झाली आहे. याठिकाणी आज 13.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या आठवड्यात महाराष्ट्रासह राज्यात आणखी गारठा वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
हेही वाचा-आता सुईविना कोरोनाची लस ! नीडल फ्री लसीकरणासाठी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याची निवड
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 20 डिसेंबरनंतर उत्तरेकडील थंडगार वारे महाराष्ट्राच्या दिशेनं मार्गक्रमण करणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी अति उच्च दाबाचे पट्टे निर्माण होण्याची शक्यता आहे. या एकंदरीत परिणाम म्हणून डिसेंबरचा शेवटचा आठवडा महाराष्ट्रासाठी हाडं गोठावणारा ठरणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात बऱ्यापैकी थंडी वाढणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.
#Pune min temp recorded today morning, indicate further dropping of mercury here with lowest recorded at Shirur 13.3°C. A good chill in air and Islam sure its time for woolens to come out here. Enjoy. Mumbai is waiting for its turn. Baramati 15.4°C Mumbai Col and Scz both 23.4°C pic.twitter.com/Q256dWee3C
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 8, 2021
आज सकाळी पुण्यातील शिरुर याठिकाणी सर्वात कमी 13.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यासोबतच हवेली (13.4), पाषाण (13.7) एनडीए (13.9), शिवाजीनगर (14.3), माळीण (14.4) अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यातील अन्य ठिकाणी 15 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान तपामान आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather update, महाराष्ट्र