मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्याच्या अनाथाश्रमातील लैला अशी बनली ऑस्ट्रेलियन संघाची कर्णधार, प्रवास आहे खास

पुण्याच्या अनाथाश्रमातील लैला अशी बनली ऑस्ट्रेलियन संघाची कर्णधार, प्रवास आहे खास

लिसाचे अजूनही त्या अनाथाश्रमाशी खूप जवळचे नाते आहे. ती तिथे जात राहते. गेल्या वर्षी लिसा पुण्यातील अनाथाश्रमात गेली होती, तिथे तिचे अतिशय भावनिक स्वागत करण्यात आले.

    नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार लिसा स्थळेकर ही महिला क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक आहे. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स (FICA) ची पहिली महिला अध्यक्षा लिसा आज म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी 43 वर्षांची झाली आहे. लिसाचे आयुष्य फार खडतर प्रवासाने भरलेले आहे. लिसाचा भारताशी विशेष संबंध आहे. तिचा जन्म भारतातच झाला. ती केवळ 21 दिवसांची असताना तिला अनाथाश्रमात टाकण्यात आले. पुण्यातील एका अनाथाश्रमात ती वाढली. येथे तिचे नाव लैला ठेवण्यात आले. इथेच एका डॉक्टर जोडप्याने तिला दत्तक घेतले आणि लिसाचे आयुष्यच बदलून गेले. याबाबत टीव्ही 9 ने वृत्त दिले आहे. लिसाला भारतीय वंशाचे डॉ. हरेन आणि त्यांची इंग्लिश पत्नी स्यू यांनी दत्तक घेतले होते. प्रथम, दोघेही मुलांसह मिशिगनमध्ये राहू लागले आणि त्यांनी मुलीचे नाव लिसा ठेवले. येथून काही काळानंतर डॉक्टर दाम्पत्य ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे स्थायिक झाले. लिसाचे अजूनही त्या अनाथाश्रमाशी खूप जवळचे नाते आहे. ती तिथे जात राहते. गेल्या वर्षी लिसा पुण्यातील अनाथाश्रमात गेली होती, तिथे तिचे अतिशय भावनिक स्वागत करण्यात आले. त्याचा व्हिडिओ लिसाने सोशल मीडियावर शेअर केला होता. हे वाचा - धोनीनं रिटेन न केलेला हा खेळाडू पुन्हा परतला चेन्नई संघात लिसाने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 187 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. तिने वनडे फॉरमॅटमध्ये विशेष कामगिरी केली आहे. तिने 125 एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन शतके आणि 16 अर्धशतकांच्या मदतीने 2728 धावा केल्या. 2013 साली विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेल्या लिसाने तिच्या कारकिर्दीला अलविदा केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Cricket news

    पुढील बातम्या