पुणे, 23 नोव्हेंबर: नैऋत्य मोसमी वारे (Monsoon rain) भारतातून परतून जवळपास एक महिना उलटला आहे. तरीही महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाचा (Rainfall in maharashtra) जोर कायम आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर अवकाळी पावसाचा जोर कायम असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढताना दिसत आहे. दरम्यानच्या काळात राज्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. किमान आणखी दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज दक्षिण कोकण आणि घाट परिसरात अनेक ठिकाणी येलो अलर्ट (yellow alert) देण्यात आला आहे.
हवामान खात्याने आज पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. पुढील तीन ते चार तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान वेगवान वारे वाहणार असून हवेचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याची असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा-चिंता वाढली ! राज्यात गेल्या 20 दिवसांत हजाराहून अधिक मुलांना Corona
याशिवाय आज ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, लातूर आणि नांदेड या 10 जिल्ह्यांत देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उद्याही राज्यात कमी अधिक प्रमाणात पावसाचा जोर कायम राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाची सरी कोसळणार आहेत. उद्या सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा-भारतात बूस्टर शॉट्स सुरू व्हायला हवेत का? जगात काय स्थिती? तज्ञांचं म्हणणं काय?
खरंतर, सध्या अरबी समुद्र आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी दरम्यान हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. पुढील किमान दोन राज्यात पावसाची स्थिती कायम राहणार आहे. गुरुवारपासून राज्यात कोठेही पावसाचा इशारा देण्यात आला नाही. गुरुवार पुढील तीन दिवस राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Weather forecast